gujarat titans wicketkeeper batter wriddhiman saha  
IPL

Wriddhiman Saha IPL 2023: वय अन् खराब फॉर्म... टीम इंडियाच्या या दिग्गज खेळाडूच्या कारकिर्दीवर टांगती तलवार?

आयपीएलमधील फ्लॉप कामगिरीनंतर या खेळाडूला टीम इंडियामध्ये संधी मिळणे कठीण...

Kiran Mahanavar

Wriddhiman Saha IPL 2023 : आयपीएल 2023 चा 44 वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या गेला. या सामन्यात आतापर्यंत खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये फ्लॉप ठरलेल्या या खेळाडूची बॅट पुन्हा फ्लॉप झाली.

या मोसमात सातत्याने फ्लॉप ठरणाऱ्या या खेळाडूच्या कारकिर्दीवर आता टांगती तलवार लटकली आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण तो आता 38 वर्षाचा आहे, आयपीएलमधील फ्लॉप कामगिरीनंतर या खेळाडूला टीम इंडियामध्ये संधी मिळणे खूप कठीण आहे.

आयपीएल 2022 ची चॅम्पियन टीम गुजरात टायटन्ससाठी हा हंगाम आतापर्यंत तरी चांगला गेला आहे. संघाने खेळलेल्या 8 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत. दरम्यान संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाला टीम मॅनेजमेंट बाहेरचा रस्ता दाखवू शकते.

या मोसमात आतापर्यंत झालेल्या 9 सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून केवळ 151 धावा आल्या. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 47 होती. अशा परिस्थितीत त्याच्या भावी कारकिर्दीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

रिद्धिमान साहाला गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघात संधी मिळालेली नाही. 3 डिसेंबर 2021 रोजी त्याने न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून त्याला संघाच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये स्थान मिळालेले नाही. दुसरीकडे वनडेचा विचार केला तर तो शेवटचा सामना 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.

रिद्धिमान साहाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 149 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या 128.42 च्या स्ट्राइक रेटने 2517 धावा आहेत. आयपीएलच्या इतक्याच सामन्यांमध्ये त्याने 11 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले आहे.

टीम इंडियाकडून खेळताना साहाने 40 कसोटी सामन्यांच्या 56 डावांमध्ये 1353 धावा केल्या आहेत, ज्यात 3 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9 सामन्यात त्याच्याकडे केवळ 41 धावा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT