Hardik Pandya esakal
IPL

मुंबई इंडियन्सने केली घोडचूक? माजी खेळाडू स्पष्टच बोलला 'पांड्या चांगला पर्याय नाही...'

Kiran Mahanavar

Mumbai Indians IPL 2024 : 15 डिसेंबरच्या संध्याकाळी एक बातमी समोर आली, ज्याने केवळ भारतीय क्रिकेट चाहत्यांनाच नव्हे तर संपूर्ण जागतिक क्रिकेटला हादरवून सोडले. मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेत रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले.

रोहितला काढून टाकल्याची ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ज्याने ती पहिल्यांदा वाचली त्याचा कदाचित विश्वास बसला नसेल. पण ही बातमी खरी ठरली आणि मुंबईने रोहितच्या जागी हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवले.

यावर माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू आणि सध्याचे क्रिकेट तज्ज्ञ आकाश चोप्राने हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्याबाबत आपले मत मांडले.

जिओ सिनेमाच्या शो 'आकाशवाणी'वर आकाश चोप्रा म्हणाला, "ही माझी मत आहे आणि आतून कोणतीही बातमी नाही. हार्दिक पांड्याने जेव्हा गुजरात सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा कर्णधारपद हा कराराचा एक भाग होता. या निर्णयाबद्दल रोहित शर्माने नक्कीच विचार केला असेल. रोहितलाही मुंबई इंडियन्सच्या भविष्यातील योजनांची माहिती देण्यात आली असावी. मला वाटते की हार्दिकला गुजरात टायटन्सचा कर्णधार बनवण्यात आशिष नेहराचा मोठा वाटा होता.

आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, आता हार्दिकला वेगळ्या स्तरावर इनपुट प्रदान करावे लागतील, कारण कर्णधार म्हणून हार्दिक तयार झालेले मला तरी वाटत नाही.

रोहितने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये मुंबईला पाच आयपीएल विजेतेपद मिळवून दिले. आणि एकूण 158 आयपीएल सामन्यांमध्ये रोहितने नेतृत्व केले. त्यापैकी 87 सामने जिंकले, 67 सामने हरले आणि चार सामने बरोबरीत संपले. या काळात त्याची विजयाची टक्केवारी 55.06 होती. चोप्राला वाटते की मुंबई भविष्याकडे पाहत असताना हा एक युगाचा अंत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Latest Marathi News Live Update: तेलवाडीजवळ दुचाकीला पिकअपचा अपघात; तरुणीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT