hardik pandya ashish nehra gujarat titans 
IPL

'कुछ तो बात है उसमे' फक्त कागद आणि पेन वापरून गुजरात टायटन्सला जिंकून दिलं

आशिष नेहराशी संबंधित एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल

Kiran Mahanavar

IPL 2022: IPL 2022: कर्णधार हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगिरी आणि शुभमन गिलच्या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या IPL 2022 च्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. पहिला हंगाम खेळणाऱ्या गुजरातने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले आहे. गुजरातच्या या यशामागे त्यांचे प्रशिक्षक आशिष नेहरा (Ashish Nehra) यांचेही मोठे योगदान आहे.

आशिष नेहरा मैदानावर फुल ऍक्टिव्ह मोडमध्ये दिसतो असतो. खेळाडूंसोबत त्याचा अनुभव शेअर करत असतो. दरम्यान आशिष नेहराशी संबंधित एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात एकीकडे मुख्य प्रशिक्षक आणि इतर संघांचे सपोर्ट स्टाफ कागदावर रणनीती आखताना दिसत आहे. नेहराचे स्वतःची स्टाइल आहे. उलटी टोपी आणि कागद, पेनने आशिष नेहरा विरोधी संघाच्या पडझडीची कहाणी लिहीत असतो. आशिष नेहराशी संबंधित हा पण एक फोटो व्हायरल होत आहे. (Ashish Nehra Photo Viral)

व्हायरल फोटोवर युजर्सकडून तीव्र प्रतिक्रियाही येत आहे. 3 इडियट्सच्या प्रसिद्ध डायलॉगसह एक मीम शेअर करताना एका यूजरने लिहिले की, 'कुछ तो बात थी तो फक्त कागद आणि पेनने सामना जिंकत आहे. दुसरीकडे आणखी एका यूजरने नेहराशी संबंधित एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये नेहरा रशीद खानसोबत सीमारेषेवर चर्चा करताना दिसत आहे.

काहीही असो, गुजरात टायटन्स आयपीएल 2022 मध्ये आपला झेंडा फडकावला आहे. हार्दिक पांड्याचे कर्णधारपद आणि नेहराचे प्रशिक्षकपद सध्यातरी लक्ष्य वेधल आहे. सामना संपल्या नंतर पांड्या म्हणाला, “मी आणि आशू पा म्हणजेच आशिष नेहरा सहमत झालो की आम्हाला नेहमीच पाच गोलंदाज खेळवायचे आहेत. जे बहुतेक प्रसंगी आमच्यासाठी सामने जिंकू शकतात. मी टी-20 क्रिकेटमध्ये अनेकदा पाहिले आहे की हा फलंदाजांचा खेळ आहे, पण गोलंदाज तुम्हाला सामने जिंकायला लावतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT