Hardik Pandya GT vs LSG esakal
IPL

Hardik Pandya GT vs LSG : हा खूप भावनिक दिवस वडील असते तर... कृणाल कॅप्टन झाल्यावर हार्दिक झाला भावनिक

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya GT vs LSG : आयपीएलमध्ये 51 व्या सामन्यात आज गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होत आहे. हा सामना पांड्या बंधूंसाठी खूप खास आहे. कारण आज हार्दिकच्या विरूद्ध कृणाल पांड्या उभा ठाकणार आहे. केएल राहुलच्या अनुपस्थितीत लखनौ सुपर जायंट्सच्या नेतृत्वाची धुरा कृणाल आपल्या खांद्यावर वाहणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन सख्खे भाऊ कर्णधारपद भूषवत आहे.

या सामन्यातील ऐतिहासिक क्षण नाणेफेकीवेळी पांड्या बंधू एकमेकांसमोर आले. लखनौने नाणेफेक जिंकली म्हणजे कृणालने बाजी मारली. यानंतर बोलताना हार्दिक पांड्या थोडा भावनिक झाला. मात्र नाणेफेकीवर कृणालने घेतलेल्या निर्णयावर टोमणा मारत हार्दिक पांड्या म्हणाला की, 'आम्ही नाणेफेक जिंकून फलंदाजी केली असती. मला जे पाहिजे ते मिळाले.'

मात्र भावनिक झालेला पांड्या पुढे म्हणाल, 'हा आमच्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. आमचे वडील असते तर त्यांना खूप अभिमान वाटला असता. ही गोष्ट पहिल्यांदाच घडत आहे. त्यामुळे आमचे कुटुंबीय खूप खूष आहे. आज एक पांड्या नक्की जिंकणार.'

हार्दिक सामन्याबद्दल म्हणाला की, आम्हाला फक्त स्वतःला सिद्ध करायचं आहे. आम्ही निर्णयाबाबत फार विचार करत नाहीये. अयशस्वी होण्याची भिती थोडी येईल. मात्र आम्हाला चांगले क्रिकेट खेळायचे आहे. आम्ही आमच्या संघात एकच अपरिहार्य बदल केला. लिटिल जोशुआ आयर्लंडकडून खेळण्यासाठी गेला आहे. त्याच्या जागी आम्ही अल्झारी जोसेफला संघात घेतलं आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT