IPL

IPL 2023 Playoffs : हैदराबादला हरवून गुजरात टायटन्स पोहोचली प्लेऑफमध्ये, जाणून घ्या पॉइंट टेबलची स्थिती

Kiran Mahanavar

IPL 2023 Latest Points Table : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गतविजेत्या गुजरात टायटन्सने आयपीएल 2023 च्या 62 व्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 34 धावांनी पराभव केला. यासह हंगामातील प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला.

गुजरातची कामगिरी यंदाच्या मोसमातही चॅम्पियनसारखी कामगिरी करत आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यांत 9 सामने जिंकले आहेत तर 4 सामने गमावले आहेत. त्याचबरोबर या पराभवानंतर हैदराबाद संघ आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा दुसरा संघ बनला आहे. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सही प्लेऑफ स्पर्धेतून बाहेर पडली होती.

गुजरात टायटन्सचे 13 सामन्यांत 18 गुण झाले आहेत. याशिवाय या संघाचा निव्वळ धावगती +0.835 आहे. हार्दिक पंड्याचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याचवेळी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने गुणतालिकेत दुसऱ्या स्थाने आहे. चेन्नई सुपर किंग्जचे 13 सामन्यांत 15 गुण आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 7 जिंकले आहेत, तर 5 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

मुंबई इंडियन्स 12 सामन्यांत 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर लखनौ सुपर जायंट्स 12 सामन्यांत 13 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. अशाप्रकारे, गुजरात टायटन्स व्यतिरिक्त, चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स टॉप-4 मध्ये आहेत.

त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. फाफ डू प्लेसिसच्या संघाचे 12 सामन्यांत 12 गुण आहेत. राजस्थान रॉयल्स सहाव्या क्रमांकावर आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स सातव्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्ज आठव्या क्रमांकावर कायम आहे. राजस्थान रॉयल्सशिवाय कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जचे १२-१२ गुण आहेत. त्याचवेळी सनरायझर्स हैदराबाद 12 सामन्यांत 8 गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे.

मात्र, गुजरात टायटन्सविरुद्धच्या पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना तडा गेला आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स 12 सामन्यांत 8 गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 188 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून सलामीवीर शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. गिलने 58 चेंडूत 101 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 2 षटकार मारले. शुभमन गिलशिवाय साई सुदर्शनने 36 चेंडूत 47 धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार लगावला.

मात्र, शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्याशिवाय गुजरात टायटन्सचे उर्वरित फलंदाज फारसे योगदान देऊ शकले नाहीत. सलामीवीर ऋद्धिमान साहा एकही धाव न काढता बाद झाला. तर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने 6 चेंडूत 8 धावांचे योगदान दिले. त्याचवेळी डेव्हिड मिलर 5 चेंडूत 7 धावा करून टी. नटराजनचा बळी ठरला. राहुल तेवतिया 3 चेंडूत 3 धावा करून फजलहक फारुकीने बाद झाला.

एकेकाळी गुजरात टायटन्स 200 धावांचा टप्पा सहज पार करेल असे वाटत होते, पण हार्दिक पांड्याच्या संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. 15 षटकांनंतर गुजरात टायटन्सची धावसंख्या 2 बाद 156 अशी होती, परंतु शेवटच्या 5 षटकांत सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले. विशेषत: भुवनेश्वर कुमारने अप्रतिम गोलंदाजी केली. त्यामुळे गुजरात टायटन्सची धावसंख्या 188 धावांवर थांबली.

सनरायझर्स हैदराबादसाठी भुवनेश्वर कुमार सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. भुवनेश्वर कुमारच्या शेवटच्या षटकात गुजरात टायटन्सचे 4 खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले, त्यात एक धावबादही होता. भुवनेश्वर कुमारने 4 षटकात 30 धावा देत 5 खेळाडूंना आपला बळी बनवले. याशिवाय मार्को जॅनसेन, फजलहक फारुकी आणि टी. नटराजन यांना 1-1 असे यश मिळाले.

हैदराबादच्या गोलंदाजांनी गुजरातला 188 धावांत रोखले, पण गोलंदाजांच्या मेहनतीवर फलंदाजांनी पाणी फेरले. हैदराबादकडून हेन्रिक क्लासेनने सर्वाधिक धावा केल्या, पण त्याला दुसऱ्या टोकाला साथ मिळाली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मी वाचलो पण माझ्या डोळ्यासमोर लोक चिरडले"; प्रत्यक्षदर्शीच्या शब्दात होर्डिंग कोसळल्याची थरारक कहाणी वाचा...

Share Market Closing: शेअर बाजारात मोठी वाढ; सेन्सेक्स-निफ्टी तेजीत, कोणत्या क्षेत्रात खरेदी?

GPT-4o : मैत्रिणीप्रमाणे गप्पा मारतो, व्हिडिओ पाहून सगळं ओळखतो.. Open AIचं सर्वात अ‍ॅडव्हान्स एआय टूल लाँच; पाहा व्हिडिओ

Amey Wagh: "आता कुठल्याही पक्षात जावं आणि कोणाही बरोबर युती करावी..."; मतदानानंतर अमेय वाघची खरमरीत पोस्ट

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपच्या शेड्यूलमध्ये गडबड, 24 तासांपेक्षा कमी अंतरात सेमीफायनल अन् फायनल?

SCROLL FOR NEXT