Hardik Pandya Rohit Sharma esakal
IPL

Hardik Pandya Rohit Sharma : अखेर गळाभेट झालीच! रोहित अन् पांड्याचा तो VIDEO तुफान व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya Hug Rohit Sharma : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील आतापर्यंतची सर्वात प्रतिक्षित भेट अखेर घडली. मुंबई इंडियन्सचा आजी कर्णधार हार्दिक पांड्या आणि माजी कर्णधार रोहित शर्मा यांची सरावादरम्यान भेट झाली. त्यावेळी यो दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं.

मुंंबई इंडियन्सने पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी रोहित शर्माला का हटवलं या प्रश्नाचा हार्दिक पांड्या आणि प्रशिक्षक मार्क बाऊचरवर भडीमार केला होता. त्यावेळी पांड्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. याच पत्रकार परिषदेत आपण कॅप्टन्सी करताना रोहितची मदत घेऊन असे वक्तव्य पांड्याने केले होते.

मात्र प्रत्यक्ष मैदानावर हे दोघे सहजतेने वावारतात का यााबाबत चाहत्यांच्या मनात शंका होती. आज सरावाच्यावेळी हार्दिक पांड्या स्वतः रोहित शर्माकडे चालत आला आणि त्याने रोहित शर्माला मिठी मारली. त्यानंतर दोघे सरावादरम्यान लाईट मूडमध्ये दिसले.

पहिल्याच प्रयत्नात गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने ट्रेड करून आपल्या संघात पुन्हा घेतले होते. पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईने आपला स्टार कर्णधार रोहित शर्माकडून संघाची धुरा काढून घेत ती हार्दिकच्या खांद्यावर ठेवली.

गेल्या 10 वर्षांत एमआयला पाच आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहित शर्माला हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळावे लागणार आहे. रोहित शर्माच्या नाराजीबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. रोहित आणि हार्दिक त्यांच्यातील मतभेद मागे ठेवून त्यांच्या संघासाठी कामगिरी करू शकतात का यावर बरेच प्रश्न विचारले गेले.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Story: चक्क RAW संचालक बनून लग्न! महिला न्यायाधीशाला फसवंल... पण सत्य बाहेर आलं तेव्हा सर्वच थक्क!

World Toilet Day 2025: 'टॉयलेट डे'ची सुरुवात कोणी आणि का केली? कारण जाणून घेतल्यावर तुम्हीही थक्क व्हाल!

'हे तर ISISसारखं…' धुरंधर ट्रेलरवर ध्रुव राठींचा रोष, प्रेक्षकही थक्क, फक्त हिंसा, खुन-खराबा आणि टॉर्चर

Indira Gandhi:'गरिबांच्या अम्मा घ्यायच्या दिवसात १२ ते १५ सभा'; इंदिरा गांधी यांचा झंजावात, जुन्या जाणत्यांना १९८० ची लख्ख आठवण..

बापरे! अकोल्याचा पारा १९९ डिग्रीवर? भर थंडीत फोडला घाम, प्रादेशिक हवामान विभागाचा प्रताप

SCROLL FOR NEXT