Hardik Pandya  esakal
IPL

Hardik Pandya IPL : मी जे काही ते फक्त... हार्दिक 'आयपीएल दशकपूर्ती'च्या व्हिडिओत काय म्हणाला?

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya IPL 10 Year Complete :

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हार्दिक पांड्या आयपीएलमधील आपलं 10 वर्ष साजरं करतोय. हार्दिक पांड्याने याबद्दलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओत हार्दिक पांड्या म्हणतो की मी आज जे काही आहे ते फक्त आयपीएलमुळेच आहे. आयपीएलने मला ओळख दिली.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. पांड्याने आयपीएलमध्ये 10 वर्षे पूर्ण केली आहेत. याबद्दल होत म्हणतो की, मी माझ्या 10 आयपीएल हंगामातील माझ्या विकासाबाबत आणि एकूण प्रवासाबाबत समाधानी आहे. मला आतापर्यंत जे काही मिळालं आणि माझा संघ ज्याने मला कायम पाठिंबा दिला त्यांचे आभार.'

व्हिडिओवरील या कॅप्शननंतर हार्दिक पांड्याने ब्लू हार्टचा इमोजी जोडला आहे. याचा अर्थ त्याला मुंबई इंडियन्सचे आभार मानायचे आहेत असा होते.

हार्दिक पांड्या व्हिडिओत म्हणतो की, आयपीएलने मला सर्वकाही दिलं आहे. आयपीएलने मला माझी ओळख दिली. नाहीतर मी आज बरोड्यातच असतो जिथे आता मी आहे मात्र अशा फॉर्ममध्ये नाही.'

या व्हिडिओत हार्दिक पांड्याचे आयपीएलमधील जुने काही फोटो दाखवण्यात आले आहेत. तर काही व्हिडिओ क्लिपिंग देखील आहेत. त्याच्या बॅकग्राऊंडला बेकरार करके हमे यु न जाईये हे गाणे लावण्यात आले आहे.

हार्दिक पांड्या आयपीएल 2024 मध्ये मुंबईचे नेतृत्व करणार आहे. पहिला सामना रविवारी गुजरात टायटन्सविरूद्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT