Anshul Kamboj IPL 2024 Sakal
IPL

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Anshul Kamboj: मुंबई इंडियन्सकडून पहिलाच सामना खेळणाऱ्या अंशुल कंभोजने ट्रेविस हेडला त्रिफळाचीत केलेलं, पण तो नो-बॉल ठरल्यानंतर बुमराह-हार्दिकने खिलाडूवृत्ती दाखवत त्याला धीर दिलेला.

Pranali Kodre

Anshul Kamboj: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत सोमवारी (6 मे) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना होत आहे. वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यातून मुंबई संघाकडून 23 वर्षीय अष्टपैलू अंशुल कंभोजने पदार्पण केले आहे.

या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने पॉवरप्लेमध्येच मध्यमगती गोलंदाजी करणाऱ्या अंशुलकडे चेंडू सोपवला.

विशेष म्हणजे 5 व्या षटकात त्याने टाकलेल्या पाचव्या चेंडू खेळताना ट्रेविस हेड चूकला. त्यामुळे चेंडूने त्याच्या स्टंपवरील बेल्स उडवले. त्यामुळे हेड परत चालला होता. मात्र, त्याचवेळी हा चेंडू नो-बॉल असल्याचा सायरन वाजला आणि हे़डला जीवदान मिळाले.

दरम्यान, पहिलाच सामना खेळणाऱ्या अंशुलने हेडला त्रिफळाचीत करूनही नो-बॉलमुळे त्याला ही विकेट न मिळाल्याने तो निराश झाला होता. पण त्यावेळी निराश झालेल्या अंशुलला जसप्रीत बुमराहने आणि कर्णधार हार्दिक पांड्याने जवळ येत धीर दिला.

त्यामुळे बुमराह आणि हार्दिकचे सध्या कौतुक होत आहे. दरम्यान, अंशुलने नंतरचाही चेंडू पुन्हा नो-बॉल टाकला, ज्यावर हेडने चौकार मारला.

तथापि, अंशुलला हेडची विकेट मिळाली नसली, तरी त्याने आठव्या षटकात मयंक अग्रवालला त्रिफळाचीत करत पहिली आयपीएल विकेट मिळवली. त्याने या सामन्यात 4 षटकात 42 धावा खर्च करत 1 विकेट घेतली.

कर्नालला जन्मलेल्या अंशुलने याआधी 19 वर्षांखालील भारतीय संघानेही प्रतिनिधित्व केले आहे. तो देशांतर्गत क्रिकेट हरियाणाकडून खेळतो. 2023-24 देशांतर्गत स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याला आयपीएल 2024 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने 20 लाखांच्या मुळ किंमतीत खरेदी केले होते.

हैदराबादने मुंबईसमोर 173 धावांचे लक्ष्य

दरम्यान, या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 173 धावा केल्या. त्यामुळे मुंबईसमोर विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य आहे. हैदराबादकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक 48 धावांची खेळी केली, तर कर्णधार पॅट कमिन्सने नाबाद 35 धावा केल्या.

मुंबईकडून हार्दिक पांड्या आणि पीयूष चावला यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तर अंशुल कंभोज आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT