Hardik Pandya Injury esakal
IPL

Hardik Pandya : पांड्यानं MI चं टेन्शन वाढवलं! अफगाणिस्तान पाठोपाठ IPL 2024 ला देखील मुकणार?

मुंबई इंडियन्सनं नुकतेच रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधार केलं होतं

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya : हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सला चांगलंच टेन्शन दिलं आहे. हार्दिक पांड्या हा अफगाणिस्तान मालिका आणि आयपीएल 2024 चा हंगाम खेळू शकणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हार्दिक पांड्या अजून घोट्याच्या दुखापतीतून सावरलेला नाही.

2023 च्या वनडे वर्ल्डकपदरम्यान हार्दिक पांड्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला वर्ल्डकपच्या सामन्यांना मुकावे लागले होते. याचबरोबर तो ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेला देखील मकुला.

हार्दिक पांड्या हा अफगाणिस्तानविरूद्धच्या टी 20 मालिकेत पुनरागमन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. खुद्द जय शहा यांनी अशा आशावाद बोलून दाखवला होता. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात होणाऱ्या अफगाणिस्तनविरूद्धच्या टी 20 मालिकाच काय हार्दिक पांड्या आयपीएल खेळण्याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वीच हार्दिक पांड्याला गुजरातकडून ट्रेड ऑफ करत आपल्या गोटात खेचलं होतं. त्यानंतर लिलावापूर्वी हार्दिक पांड्या हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार असेल आणि तो 2024 च्या हंगामात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करेल अशी घोषणा केली. एकप्रकारे रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार करण्यात आलं.

त्यानंतर सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले. त्यांचे सोशल मीडियावरील लाखो फॉलोअर्स एका झटक्यात कमी झाले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : : खरीप हंगामात डीएपी या रासायनिक खताची टंचाई; पावसामुळे मशागतीची कामे ठप्प

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT