Hardik Pandya Statement after MI vs KKR Match IPL 2024 sakal
IPL

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

Hardik Pandya Statement after MI vs KKR Match IPL 2024 : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी शुक्रवारीही कायम राहिली

Kiran Mahanavar

Hardik Pandya Statement after MI vs KKR Match IPL 2024 : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी शुक्रवारीही कायम राहिली. घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विजयासाठी 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स 18.5 षटकांत 145 धावांत सर्वबाद झाली आणि सामना 24 धावांच्या फरकाने गमावला.

जसप्रीत बुमराहच्या शानदार गोलंदाजीमुळे मुंबईने कोलकात्याला 19.5 षटकांत 169 धावांत गुंडाळले, परंतु त्यानंतर विजयाचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले. सूर्यकुमार यादव (35 चेंडूत 56) शिवाय मुंबईच्या इतर कोणत्याही फलंदाजाला केकेआरविरुद्ध धावा करता आल्या नाहीत. शेवटी टीम डेव्हिडने (20 चेंडूत 24 धावा) मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर नेण्याचा प्रयत्न केला पण तोही अपयशी ठरला.

केकेआरविरुद्ध 24 धावांच्या फरकाने पराभव झाल्यानंतर हार्दिक पांड्याने पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले आणि तो म्हणाला की, आम्ही चांगली फलंदाजी केली नाही, साहजिकच आम्ही कोणाती मोठी भागीदारी करू शकलो नाही आणि सतत विकेट पडत राहिल्या. जर तुम्ही टी-20 सामन्यांमध्ये सतत विकेट गमावत असाल तर तुम्हाला त्याचा फटका सहन करावा लागेल. असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मिळण्यास वेळ लागेल. पण सध्या बोलण्यासारखे फारसे काही नाही.

हंगामातील 11 सामन्यांत आठव्या पराभवानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफमधून बाहेर पडली आहे. अशा परिस्थितीत या कठीण पराभवातून सावरताना हार्दिक म्हणाला, मी स्वत:ला सांगत असतो की हे आव्हानात्मक आहे, आणि आव्हाने स्वीकारून परिस्थितीशी लढा आणि मैदान सोडू नका. चांगले दिवस सारखे कठीण दिवस येतात पण समोरच्यावर खंबीरपणे उभे राहिले तरच. हे आव्हानात्मक आहे पण जीवनात आव्हाने महत्त्वाची आहेत, ती तुम्हाला अधिक चांगली बनवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

ऊसतोड महिलांचं जगणं मांडणाऱ्या 'कूस' लघुपटाला राज्यस्तरीय तिसरे पारितोषिक

Latest Marathi News Updates : कोल्हापूर जिल्ह्यातील कोपार्डे येथे भानामतीचा प्रकार

SCROLL FOR NEXT