Lucknow Heavy Rain sakal
IPL

LSG vs RCB: IPL चाहत्यांसाठी वाईट बातमी! लखनौ-आरसीबी सामना रद्द होणार?

Kiran Mahanavar

IPL 2023 : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना होत आहे. लखनौचा संघ 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर आरसीबी 8 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघ हा सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील, मात्र त्याआधीच चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे.

लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. सोमवारी सकाळपासून लखनऊमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत सामना होण्याची शक्यता फारच कमी आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार रात्री 10 वाजेपर्यंत पाऊस पडू शकतो, असे झाल्यास सामना वाहून जाऊ शकतो. इनसाइड स्पोर्टच्या अहवालानुसार, दिवसा 48% तर रात्री 42% पावसाची शक्यता आहे.

आयपीएलच्या चालू हंगामात दोन्ही संघांमध्ये दुसऱ्यांदा सामना होणार आहे. पहिल्या सामन्यात लखनौने आरसीबीचा 1 गडी राखून पराभव केला. या रोमांचक सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. अशा स्थितीत गेल्या काही सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारी आरसीबी मागील पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने या हंगामात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाला 4 विजय आणि 4 पराभव पत्करावे लागले आहेत. त्याचवेळी, लखनौ सुपर जायंट्स संघाने खेळलेल्या 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत, तर 3 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईत मोठी पाईपलाईन दुरुस्ती; 'या' दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत राहणार, पण कोणत्या भागात? वाचा यादी...

Space Station on Earth : भारत बनवत आहे स्वतःचे अंतराळ स्थानक; फक्त 4 वर्षांत पृथ्वीवर येणार स्पेस स्टेशन; अगोदर होता फक्त चीनचा दबदबा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील महापौर बंगल्याचं नूतनीकरणाच काम अंतिम टप्प्यात

HSRP Number Plate न बसवल्यास वाहनधारकांच्या खिशाला लागणार मोठी कात्री ! दररोज १००० रुपये दंड अन्...

धुरंधर २ मध्ये यामी गौतमची दमदार भूमिका, अ‍ॅक्शन रोलमध्ये दिसणार

SCROLL FOR NEXT