Heinrich Klaasen Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants ESAKAL
IPL

SRH vs LSG : क्लासेनचा क्लास त्याला समादची साथ! हैदराबादने लखनौसमोर ठेवले 183 धावांचे आव्हान

अनिरुद्ध संकपाळ

Heinrich Klaasen Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants : प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनराईजर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्ससमोर विजयासाठी 183 धावांचे आव्हान ठेवले. हैदराबादकडून हेन्री क्लासनने 47 धावांची अब्दुल समादने नाबाद 37 धावांची खेळी केली. सलामीवीर अनमोलप्रीतनेही 36 धावांचे योगदान दिले. लखनौकडून कृणाल पांड्याने 2 विकेट्स घेतल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनराईजर्स हैदराबादने पॉवर प्लेमध्ये 56 धावांपर्यंत मजल मारली. अभिषेक शर्मा 7 धावांची भर घालून माघारी परतल्यानंतर अनमोलप्रीत आणि राहुल त्रिपाठी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी रचत हैदराबादला अर्धशतकी मजल मारून दिली. मात्र यश ठाकूरने 13 चेंडूत 20 धावा करणाऱ्या राहुल त्रिपाठीला बाद करत हैदराबादला दुसरा धक्का दिला.

पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात केल्यानंतर अमित मिश्राने अनमोलप्रीतला 36 धावांवर बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. यानंतर कर्णधार एडिम माक्ररम आणि हेन्री क्लासेनने हैदराबादला शतकी मजल मारून दिली. मात्र लखनौचा कर्णधार कृणाल पांड्याने माक्ररमचा 28 धावांवर बाद करत हैदराबादला पाचवा धक्का दिला. पाठोपाठ पुढच्याच चेंडूवर ग्लेन फिलिप्सचा त्रिफळा उडवून देत हैदराबादची अवस्था 6 बाद 115 धावा अशी केली.

कर्णधार माक्ररम बाद झाल्यानंतर हेन्री क्लासेन आणि उब्दुल समाद यांनी पाचव्या विकेटसाठी 58 धावांची अर्धशतकी भागीदी रचली. या दोघांनी हैदराबादला 150 चा टप्पा पार करून दिला. मात्र डावाची शेवटीची दोन षटके राहिली असताना क्लासेन 47 धावांवर झेलबाद झाला. यानंतर समादने शेवटच्या षटकात 9 धावा करत हैदराबादला 20 षटकात 182 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT