Honey bee Attack During Mumbai Indians Practice Session ESAKAL
IPL

IPL 2022 : आता मधमाशांनाही MIच्या रथी महारथींना 'झोपवले'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामात (IPL 2022) मुंबई इंडियन्सच्या संघाला काही केल्या विजयी सूर गवसत नाहीये. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आतापर्यंत खेळलेले सहाच्या सहा सामने गमावले आहेत. आयपीएलची सर्वाधिक 5 विजेतेपदं मुंबईने जिंकली आहेत. मात्र त्यांना यंदाच्या हंगामात एक विजय मिळवता येत नाही. पराभवाच्या मालिकेने हैराण झालेल्या मुंबई इंडियन्सला आता मधमाशांनही (Honey bee Attack) गुडघे टेकायला लावले. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होत. आहे.

मुंबई इंडियन्स आपला सातवा सामना कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध गुरुवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नई म्हणजे 'एकाला झाकावे आणि दुसऱ्याला काढावे' असा प्रकार आहे. मुंबई प्रमाणेच आयपीएलमधील दुसरा मोठा संघ चन्नईलाही आतापर्यंत एकच सामना जिंकता आला आहे. आता मुंबईच्या आणि चेन्नईमध्ये सामना होत आहे त्यामुळे फॅन्समध्ये उत्सुकता आहे. या सामन्यात तरी मुंबई इंडियन्सचा संघ आपली कामगिरी उंचावणार का हा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे. या सामन्यासाठी मुंबईचा संघ कसून सराव करत आहे. मात्र त्यांच्या सरावावर मधमाशांनी हल्ला करत आधीच खचलेल्या मुंबईच्या खेळाडूंना मैदानावरच भुईसपाट केले.

आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्सची सहा सामने खेळूनही आपली गुणांची पाटी कोरीच राहिली आहे. त्यामुळे ते सध्या 10 व्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्जने सहा पैकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे ते दोन गुणांसह मुंबईच्या एक पायरी वर म्हणजे नवव्या क्रमांकावर आहेत. सध्या गुणतालिकेत गुजरात टायटन्स 10 गुणांसह अव्वल तर आरसीबी 10 गुण मिळवून दुसऱ्या स्थावावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT