SL Vs AFG Matheesha Pathirana ODI Debut esakal
IPL

SL Vs AFG Matheesha Pathirana Debut : जिंकले तर अफगाण, मात्र CSK च्या पथिरानाचे कसं होतं वनडे पदार्पण?

अनिरुद्ध संकपाळ

SL Vs AFG Matheesha Pathirana ODI Debut : आयपीएलचा 16 वा हंगाम चेन्नई सुपर किंग्जने जिंकून पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले. यंदाच्या चेन्नईच्या संघातील अनेक युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. बेबी मलिंगा या नावाने प्रसिद्ध असणारा वेगवान गोलंदाज मथीशा पथिरानाने देखील यंदाच्या हंगामात आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले. धोनीनेही त्याचे कौतुक केले. आज या पथिरानाने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये श्रीलंकेकडून पदार्पण केले.

श्रीलंका आजपासून अफगाणिस्तानविरूद्ध मायदेशात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळत आहे. आज या मालिकेतील पहिला वनडे सामना झाला. यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा 6 विकेट्सनी पराभव करत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने श्रीलंकेला 268 धावात गुंडाळले. श्रीलंकेकडून असलंकाने 91 तर धनंजया डि सेल्वाने 51 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानकडून फजलहक फारूकी आणि फरीद अहमद यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्यांना अजमतुल्ला, मुजीब, नूर अहमद आणि नबीने प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

श्रीलंकेचे 269 धावांचे आव्हान पार करताना अफगाणिस्तानने इब्राहीम झरदान आणि रहमत शाह यांनी दमदार फलंदाजी केली. झरदानने 98 चेंडूत 98 धावा चोपल्या त्याचे शतक अवघ्या 2 धावात हुकले. रमहतने 55 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. लंकेकडून कुशल रजिताने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर कुमारा आणि पथिरानाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

चेन्नईचा स्टार गोलंदाज पथिरानाने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात 8.5 षटके टाकली त्यात एकही षटक निर्धाव न टाकता तब्बल 66 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली. त्याने तब्बल 16 वाईड चेंडू टाकले. त्याने सर्वाधिक 7.50 धावा प्रतिषटकच्या सरासरीने धावा दिल्या. पथिरानाने तब्बल 16 वाईड बॉल टाकल्याने त्याचे पदार्पण फारसे चांगले झाले नाही असे आपण म्हणू शकतो.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT