How Delhi Capitals Can Still Qualify For Playoff sakal
IPL

DC Playoffs Scenario : दिल्लीचं नशिब हैदराबादच्या हाती! प्लेऑफ गाठण्यासाठी जुळावे लागणार 'हे' गणित...

Delhi Capitals Playoffs Scenario : लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत.

Kiran Mahanavar

How Delhi Capitals Can Still Qualify For Playoff : लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत.

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात आतापर्यंत आपले सर्व लीग सामने खेळले आहेत, त्यापैकी 7 सामने जिंकले आहेत. दिल्ली 14 सामन्यांतून 7 विजयांसह 14 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे दिल्लीचा नेट रन रेट -0.377 आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण दिल्ली अजूनही प्लेऑफसाठी पात्र ठरू शकते.

दिल्ली कॅपिटल्सचे भविष्य आता त्याच्या हातात नाही तर इतर संघांवर आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादला मोठा पराभव पत्करावा लागला तरच दिल्लीला प्लेऑफसाठी पात्रता मिळू शकेल.

हैदराबादने या हंगामात आतापर्यंत एकूण 12 सामने खेळले आहेत, त्यापैकी 7 विजयांसह ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. हैदराबादचा नेट रन रेट +0.406 आहे. हैदराबादचेही 14 गुण आहेत तर दिल्लीचेही 14 गुण आहेत. अशा स्थितीत हैदराबादने पुढचे दोन सामने गमावले तर हैदराबाद आणि दिल्ली या दोघांची 14-14 अशी स्थिती असेल. येथे संपूर्ण खेळ नेट रन रेटचा असेल.

जर हैदराबादचा नेट रन रेट दिल्लीपेक्षा कमी झाला, तर दिल्लीही प्लेऑफसाठी पात्र ठरू शकते. हैदराबादचा एक सामना गुजरात टायटन्सविरुद्ध 16 मे रोजी खेळायचा आहे, तर दुसरा सामना 19 मे रोजी पंजाब किंग्जविरुद्ध खेळायचा आहे. जर हैदराबादने दोन्ही सामने एकूण 194 धावांनी गमावले तर त्याचा नेट रन रेट दिल्लीपेक्षा वाईट होईल.

यानंतर चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूलाही या सामन्यात पराभूत केले तर दिल्ली प्लेऑफसाठी पात्र ठरेल. अशा स्थितीत दिल्लीला नशिबाची साथ मिळते का हे पाहायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

Uttarakhand: ट्रिप करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! भीमताल ते नैनीताल प्रवास होणार मिनिटांत? रोपवे प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

SCROLL FOR NEXT