India Women Team Sakal
IPL

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

India Squad for T20 WC: टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या निवडीसाठी निवड समितीची मंगळवारी जय शाह यांच्याबरोबर बैठक झाली होती.

Pranali Kodre

India Squad for T20 World Cup 2024: आगामी टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी मंगळवारी (30 एप्रिल) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. 1 जून ते 29 जून 2024 दरम्यान ही स्पर्धा खेळवला जाणार आहे.

दरम्यान, भारतीय संघाची घोषणा करण्यापूर्वी निवड समिती आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यात अहमदाबादमध्ये मंगळवारी बैठक झाली होती. या बैठकीनंतर भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.

भारतीय संघाची नेतृत्वाची धूरा अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माच्या खांदयावर सोपवण्यात आली असून उपकर्णधारपद हार्दिक पांड्याकडे देण्यात आले आहे. तसेच यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना संधी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएल 2024 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या शिवम दुबेलाही संघात स्थान मिळाले आहे.

दरम्यान आता बैठकीत कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली, याची माहिती समोर आली आहे. बीसीसीआयच्या एका सुत्राने पीटीआयला सांगितले की 'हार्दिकच्या स्थानावर बरीच चर्चा झाली.रिंकूला केवळ दुर्दैवी म्हणता येईल. हार्दिकही संघात असताना दुबे आणि रिंकू यांच्यात स्पर्धा होती.'

रिंकू सिंगला 15 जणांच्या भारतीय संघात स्थान मिळाले नसले, तरी त्याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्यासह राखीव खेळाडूंमध्ये शुभमन गिल, आवेश खान आणि खलील अहमददेखील आहे.

गिलच्या आधी यशस्वी जैस्वालला रोहित शर्मासह सलामीसाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे. तसेच अष्टपैलू म्हणून दुबे आणि हार्दिकसह दोन फिरकी गोलंदजी करू शकणाऱ्या रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना संधी मिळाली आहे.

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Law: नामांकन वादांना पूर्णविराम? निवडणूक कायद्यात बदलांना मंजुरी; महापालिका निवडणुकीआधी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

Gen-Z Post Office: मुंबईत पहिले जेन-झी पोस्ट ऑफिस! विद्यार्थ्यांना विशेष फायदा होणार, काय आहेत सुविधा?

Railway Luggage Rules : विमानासारखेच नियम रेल्वेमध्येही लागू होणार! , ‘फर्स्ट एसी’मध्ये ७० किलो पर्यंतच सामान मोफत नेता येणार

Latest Marathi News Live Update : अधिकारी-कर्मचारी महासंघाचा उद्यापासून ‘कामबंद’चा इशारा

Pune Crime : अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई; साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त; पाच जणांना अटक!

SCROLL FOR NEXT