CSK 
IPL

CSK ला 'गंभीर' सल्ला; उणीव भरुन काढायची असेल तर...

चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली असली तरी...

सुशांत जाधव

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात आयपीएल (IPL) प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर सामना रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी माजी क्रिकेटर गौतम गंभीरनं चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मोठा सल्ला दिलाय. प्ले ऑफच्या सामन्यासाठी मैदानात उतरताना चेन्नईने रॉबिन उथप्पाला (Robin Uthappa) प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवावे, असे गंभीरने म्हटले आहे. उथप्पा हा देखील रैनाप्रमाणेच मोठा खेळाडू आहे. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवावे, असे गंभीरला वाटते.

रॉबिन उथप्पाला यंदाच्या हंगामात अधिक संधी मिळालेली नाही. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात चेन्नईने त्याला संधी दिली. या हंगामातील रॉबिन उथप्पाचा हा दुसरा सामना होता. चेन्नई सुपर किंग्जचा हा निर्णय गंभीरला सकारात्मक वाटतो. प्ले ऑफमध्ये देखील धोनीने उथप्पावर विश्वास दाखवायला पाहिजे. रैनाच्या जागी त्याला पसंती देणं चेन्नई सुपर किंग्जसाठी फायदेशीर ठरेल, असे मत गंभीरने मांडले आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोशी संवाद साधताना गंभीरने यावर भाष्य केले.

गंभीर म्हणाला की, तुम्ही (CSK ) सुरेश रैनाला खूप संधी दिली. पण त्याला संधीच सोनं करता आलेलं नाही. त्यानंतर आता तुम्ही उथप्पाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले. हा चांगला निर्णय आहे. उथप्पाही रैनाच्या तोडीस तोड खेळाडू आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्येही त्यालाच संधी द्यायला हवी. एक सामन्यानंतर त्याला बाकावर बसवणे योग्य ठरणार नाही, असे गंभीरने म्हटले आहे.

चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली असली तरी संघातील मध्यफळीत अजूनही उणीवा आहेत. रैनाच्या जागी उथप्पाला खेळवून ही उणीव भरून काढणे हाच धोनीसमोर योग्य पर्याय असल्याचे मत गंभीरने मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT