IPL

IPL 2021 : दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात काय-काय घडलं

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील हायहोल्टेज सामना

सुशांत जाधव

IPL 2021 CSK vs MI Live : युएईतील दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मेदानातून उर्वरित आयपीएल स्पर्धेला पुन्हा सुरुवात झालीये. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील हायहोल्टेज सामन्यात चेन्नईने बाजी मारली. 20 धावांनी सामना जिंकत यंदाच्या हंगामात दिल्लीच्या मैदानातील पराभवाची चेन्नईने परतफेड केली. पहिल्या टप्प्यातील स्पर्धेत पोलार्डच्या जिवावर मुंबई इंडियन्सने चेन्नईविरुद्ध 4 गडी राखून विजय नोंदवला होता.

चेन्नई सुपर किंग्जने 20 धावांनी विजय नोंदवत गुणतालिकेत अव्वलस्थान गाठले

135-8 : राहुल चाहरला ब्रावोनं खातेही उघडू दिले नाही

134-7 : मिल्नेचाही खेळ खल्लास, ब्रावोनं 15 धावांवर धाडले तंबूत

94-6 : ब्रावो-धोनीने कृणाल पांड्याला केलं धाव बाद, त्याने अवघ्या 4 धावांची भर घातली

सौरभ तिवारीचे अर्धशतक वगळता एकालाही मैदानात धग धरता आला नाही.

87-5 : कायरेन पोलार्डच्या रुपात मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, हेजलवूडला मिळाले यश

58-4 : इशान किशनही 11 धावांची भर घालून परतला, ब्रावोला मिळाले यश

37-3 : शार्दुल ठाकूरनं उडवल्या सूर्यकुमार यादवच्या दांड्या, त्याने 7 चेंडूत केवळ 3 धावांची भर घातली

35-2 : अनमोलप्रित सिंगही 16 धावांची भर घालून माघारी, दीपक चाहरलाच मिळाले यश

18-1 : दीपक चाहरची कमाल, क्विंटन डिकॉकला 17 धावांवर धाडले माघारी

क्विंटन डिकॉक आणि अनमोलप्रित सिंगनं केली मुंबईच्या डावाला सुरुवात

चेन्नई सुपर किंग्जने निर्धारित 20 षटकात 6 बाद 156 धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जकडून सलामीवीर ऋतूराज गायकवाडने 58 चेंडूत 88 धावांची आश्वासक आणि नाबाद खेळी केली

144-6 : 8 चेंडूत तुफान फटकेबाजीसह 23 धावा करुन ब्रावो तंबूत परतला, बुमराहला मिळाले यश

105-5 : मुंबईकडून आयपीएलचा शंभरावा सामना खेळणाऱ्या बुमराहला पहिले यश, रविंद्र जाडेजाला 26 धावांवर धाडले तंबूत

24-4 : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीही 3 धावा करुन माघारी, मिल्नेला मिळालं यश

7-3 : रैनाच्या रुपात चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक धक्का, रैनाने अवघ्या 4 धावांची भर घातली. त्यालाही बोल्टनेच तंबूत धाडले.

एडम मिल्नेच्या चेंडूवर रायडू दुखापतग्रस्त, मैदानात सोडण्याची आली वेळ

2-2 : मिल्नेनं मोईन अलीला धाडले माघारी, त्यालाही खाते उघडता आले नाही

1-1 : ट्रेंट बोल्डने मुंबई इंडियन्सला पहिले यश मिळवून दिले, त्याने फाफ ड्युप्लेसीसला खातेही उघडू दिले नाही

मुंबई इंडियन्सचा संघ :

क्विंटन डि कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, अनमोलप्रित सिंग, केरॉन पोलार्ड (कर्णधार), सौरभ तिवारी, कृणाल पांड्या, एडम मायले, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.

चेन्नई सुपर किंग्ज

फाफ ड्युप्लेसीस, ऋतूराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार), रविंद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जोश हेजलवूड.

टॉस जिंकून महेंद्र सिंह धोनीने घेतला फलंदाजी करण्याचा निर्णय; मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मैदानात उतरला असून पोलार्ड टॉससाठी आल्याचे पाहायला मिळाले.

चेन्नई सुपर किंग्जची फॅमिलीही सामन्यासाठी सज्ज

आयपीएलच्या रिंगणात मुंबई इंडियन्सला खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन शेअर केलेला खास फोटो

टॉस जिंकणारी टीम धावांचा पाठलाग करण्यास पसंती देईल, असे ट्विट ब्रदिनाथ याने केलंय

गुणतालिकेत चेन्नई मुंबईपेक्षा भारी!

मुंबई पलटनही हायहोल्टेज सामन्यासाठी सज्ज

कॅप्टन कूल धोनीची सामन्यापूर्वीची खास झलक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT