CSK-vs-SRH-Ruturaj-Gaikwad 
IPL

IPL 2021: CSKचा 'प्ले-ऑफ्स'मध्ये दणक्यात प्रवेश! हैदराबाद OUT

विराज भागवत

IPL 2021 Chennai vs Hyderabad Live Updates

IPL 2021 CSK vs SRH: गेल्या वर्षी सुमार दर्जाची कामगिरी करणाऱ्या चेन्नईने आज हैदराबादवर विजय मिळवत आपले प्ले-ऑफ्सचे तिकीट पक्के केले. गेल्या हंगामात स्पर्धेतून बाहेर जाणारा सर्वात पहिला संघ चेन्नईचा होता. पण यंदाच्या हंगामात प्ले-ऑफ्समध्ये प्रवेश करणारा पहिला संघ CSK ठरला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना १३४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात महेंद्रसिंग धोनीने विजयी षटकार लगावत CSK ला प्ले-ऑफ्सचे तिकीट मिळवून दिले. तर, आपल्या नवव्या पराभवासह हैदराबादचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला.

पाहा सामन्यातील महत्त्वाच्या घडामोडी-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSKचा 'प्ले-ऑफ्स'मध्ये दणक्यात प्रवेश! हैदराबाद OUT

CSKचा 'प्ले-ऑफ्स'मध्ये दणक्यात प्रवेश! हैदराबाद OUT

CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला.

--------------------------------------------------------------------

रैना, डु प्लेसिस, मोईन अली बाद; सामन्यात रंगत

रैना, डु प्लेसिस, मोईन अली बाद; सामन्यात रंगत

सामना चेन्नईच्या दिशेने पूर्णपणे झुकलेला असताना राशिद खानने मोईन अलीला (१७) त्रिफळाचीत केले. पुढच्याच षटकात जेसन होल्डरने आधी सुरेश रैनाला (२) आणि पाठोपाठ सेट झालेल्या फाफ डु प्लेसिसला (४१) माघारी पाठवत सामन्यात रंगत आणली.

--------------------------------------------------------------------

ऋतुराजचं अर्धशतक हुकलं; धडाकेबाज खेळी संपली

ऋतुराजचं अर्धशतक हुकलं; धडाकेबाज खेळी संपली

चेन्नईचा मराठमोळा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याची तडाखेबाज खेळी अर्धशतकाच्या आधीच संपुष्टात आली. ऋतुराजने ३८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४५ धावा केल्या. पण जेसन होल्डरच्या चतुर गोलंदाजीमुळे ऋतुराजला अर्धशतकाने हुलकावणी दिली.

--------------------------------------------------------------------

ऋतुराज-डुप्लेसिस सलामी जोडीचा 'पॉवर-प्ले'!

ऋतुराज-डुप्लेसिस सलामी जोडीचा 'पॉवर-प्ले'!

ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस या सलामी जोडीने चेन्नईला दमदार सुरूवात करून दिली. पॉवर प्ले च्या पहिल्या ६ षटकात चेन्नईने एकही विकेट न गमावता ४७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर पुढच्याच षटकात त्यांनी अर्धशतकी सलामीही दिली.

--------------------------------------------------------------------

चेन्नईचा भेदक मारा; हैदराबादला १३४वर रोखलं!

--------------------------------------------------------------------

INNINGS BREAK

--------------------------------------------------------------------

चेन्नईचा भेदक मारा; हैदराबादला १३४वर रोखलं!

चेन्नईच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादच्या फलंदाजांना फटकेबाजी करता आली नाही. अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजी करणाऱ्या CSK ने SRH ला २० षटकात ७ बाद १३४ धावांवर रोखलं. हैदराबादकडून वृद्धिमान साहाने सर्वाधिक ४४ धावा केल्या. तर चेन्नईकडून जोश हेजलवूडने २४ धावांत ३ बळी टिपले.

--------------------------------------------------------------------

अभिषेक, समद तंबूत; हैदराबादची स्थिती बिकट

अभिषेक, समद तंबूत; हैदराबादची स्थिती बिकट

अभिषेक शर्मा आणि अब्दुल समद हे हैदराबादचे दोन युवा फलंदाज एकाच षटकात बाद झाले. दोघांनीही प्रत्येकी १८ धावा केल्या. दोन्ही फलंदाजांनी प्रत्येकी १ चौकार आणि १ षटकार लगावला. या दोघांच्या बाद होण्याने हैदराबादची अवस्था ६ बाद ११० झाली.

--------------------------------------------------------------------

साहाचं अर्धशतक हुकलं; हैदराबाद संकटात

साहाचं अर्धशतक हुकलं; हैदराबाद संकटात

अप्रतिम फलंदाजी करणारा हैदराबादचा सलामीवीर वृद्धिमान साहा याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. प्रियम गर्ग स्वस्तात बाद झाल्यानंतर साहावर संघाची मदार होती. पण तो ४६ चेंडूत ४४ धावा काढून माघारी परतला.

--------------------------------------------------------------------

ब्राव्होची कमाल; कर्णधार विल्यमसन माघारी

ब्राव्होची कमाल; कर्णधार विल्यमसन माघारी

चांगल्या लयीत असणारा हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याला ड्वेन ब्राव्होने चतुर गोलंदाजी करून माघारी पाठवलं. ११ चेंडूत ११ धावा काढून तो पायचीत झाला.

--------------------------------------------------------------------

हैदराबादला पहिला धक्का; जेसन रॉय झेलबाद

हैदराबादला पहिला धक्का; जेसन रॉय झेलबाद

गेल्या सामन्यात धडाकेबाज अर्धशतक ठोकणारा सलामीवीर जेसन रॉय आज स्वस्तात बाद झाला. त्याला केवळ २ धावा करता आल्या. जोश हेलजवूडने त्याला माघारी धाडले.

--------------------------------------------------------------------

नाणेफेक आणि संघ

--------------------------------------------------------------------

CSK vs SRH... पाहा आकडेवारी

CSK vs SRH... पाहा आकडेवारी

  • चेन्नईने आतापर्यंत IPL स्पर्धेत १६ वेळा हैदराबाद संघाशी दोन हात केले आहेत. त्यापैकी १२ वेळा चेन्नईला विजय मिळाला असून ४ वेळा हैदराबाद विजय झाला आहे.

  • आज ज्या शारजाच्या मैदानात सामना रंगणार आहे, तेथे या आधी चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात एक सामना झाला होता. त्यात चेन्नई हैदराबादवर भारी पडली होती.

  • हैदराबाद विरूद्ध चेन्नई यांच्यातील शेवटच्या ५ सामन्यांचा हिशेब पाहिला तर ३ वेळा चेन्नईने बाजी मारली आहे तर २ वेळा हैदराबाद वरचढ ठरली आहे.

CSK-vs-SRH

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT