Ashwin  Twitter
IPL

IPL Record : मिलरची शिकार करत अश्विनने रचला खास विक्रम

मिलरला चकवा देत त्याने पंतच्या मदतीने दिल्ली कॅपिटल्सला तिसरे यश मिळवून दिले.

सुशांत जाधव

IPL 2021 DC vs RR : राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने मैलाचा पल्ला पार केलाय. मिलरला चकवा देत त्याने पंतच्या मदतीने दिल्ली कॅपिटल्सला तिसरे यश मिळवून दिले. या विकेटसह अश्विनने टी-20 कारकिर्दीत 250 विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला आहे. असा पराक्रम करणारा अश्विन हा भारताचा तिसरा गोलंदाज ठरलाय. यापूर्वी पियुष चावला आणि अमित मिश्रा या फिरकीपटूंनी 250 विकेट घेतल्या होत्या. या दोघांच्या नावे टी-20 कारकिर्दीत प्रत्येकी 262 विकेट आहेत.

अश्विनने 2007 ते 2021 या कालावधीत वेगवेगळ्या संघाकडून खेळताना हा मैलाचा पल्ला गाठला आहे. 8 धावांत 4 विकेट ही अश्विनची सर्वोच्च कामगिरी आहे. गेल्या काही वर्षांपासून तो केवळ कसोटी क्रिकेटमध्येच भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना दिसले होते. पण युएईच्या मैदानात रंगणाऱ्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात त्याला संधी देण्यात आली आहे. ही संधी उगाच मिळालेली नाही, हेच त्याच्या या रेकॉर्डवरुन सिद्ध होते.

टी-20 कारकिर्दीत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम हा ड्वेन ब्रावोच्या नावे आहे. ब्रावोने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यासह वेगवेगळ्या लीगमध्ये 500+ सामने खेळले असून यात त्याने 546 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या जवळपासही अन्य कोणी दिसत नाही.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इम्रान ताहिरच्या खात्यात 420 विकेट्स आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सनील नरेनच्या खात्यात 413 विकेट जमा आहेत. हे तिन्ही गोलंदाज आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघाकडून खेळतात. मलिंगा, राशिद खान, शाकीब अल हसन, सोहिल तन्वीर, शाकीह अल हसन, वहाब रियाझ यांच्या खात्यात 350 + विकेट्सची नोंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : काँग्रेस खासदार राहुल गांधी स्मृती भवनाच्या दिशेने निघाले

IND U-19 vs SL U-19 : भारताचा श्रीलंकेवर 211 धावांनी दणदणीत विजय; युवा कसोटी मालिका 1-0 ने खिशात

Mumbai Rain: राज्यात पावसाचा कमबॅक! ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा; मुंबई, पालघरसह 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

Guru Purnima 2026: 28 की 29 जुलै? यंदा गुरुपौर्णिमा नेमकी कधी? उदयतिथीनुसार जाणून घ्या योग्य तारीख, तिथी आणि धार्मिक महत्त्व

IND vs ZIM 1st T20I: श्रेयस अय्यरने इतिहास रचला! जगात असा पराक्रम करणारा पहिलाच कर्णधार ठरला, ८८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशीही बरोबरी

SCROLL FOR NEXT