steve-smith-catch 
IPL

IPL 2021 Video: KKRचा दिल्लीवर विजय; सुनील नारायण सामनावीर

विराज भागवत

पाहा, KKR vs DC सामन्याचे Highlights

IPL 2021 KKR vs DC Highlights: टेबल टॉपर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या दिल्लीला खराब फलंदाजीचा फटका बसला. करो या मरोचा सामना खेळणाऱ्या कोलकाता संघाने दिल्लीला पराभूत केले. दिल्लीच्या फलंदाजांनी २० षटकांत केवळ १२७ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ आणि ऋषभ पंत या दोघांनीही प्रत्येकी ३९ धावा केल्या. पण त्यांच्या खेळीचा दिल्लीला फारसा फायदा होऊ शकला नाही. १२८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या नितीश राणाने शेवटपर्यंत खिंड लढवत नाबाद ३६ धावा करून संघाला विजय मिळवून दिला.

कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीचे सलामीवीर स्टीव्ह स्मिथ (३९) आणि शिखर धवन (२४) यांनी संघाला दमदार सुरूवात चांगली सुरुवात करून दिली होती. ऋषभ पंतनेही ३९ धावांची खेळी केली. पण श्रेयस अय्यर, शिमरॉन हेटमायर, ललित यादव, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन आणि आवेश खान या साऱ्यांनी फलंदाजीत निराशा केली. सुनील नारायणने १८ धावा देऊन २ गडी, फर्ग्युसनने १० धावांत २ बळी, व्यंकटेश अय्यरने २९ धावांत २ बळी तर टीम साऊदीने २९ धावांत १ बळी टिपला.

या माफक आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर व्यंकटेश अय्यरने १४ धावा केल्या. पण शुबमन गिलने ३० धावांची खेळी करून संघाला आश्वासक सुरूवात करून दिली. त्यानंतर नितीश राणाने एकहाती डाव सावरत संघाला विजय मिळवून दिला. राहुल त्रिपाठी, इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक या फलंदाजांनी निराशा केली. सुनील नारायणने १० चेंडूत २१ धावा कुटल्या. त्याने २ षटकार आणि १ चौकार लगावला. अष्टपैलू खेळ करणाऱ्या सुनील नारायणला सामनावीर घोषित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

Latest Marathi News Updates : खासदार ओमराजे निंबाळकरांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक; जनसंपर्कात अडथळा

Solapur fraud:'बार्शीतील अनेकांची एक कोटी ७० लाखांची फसवणूक'; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष, सात जणांवर गुन्हा

Weather Alert IMD : हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट, पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT