KKR vs RCB 
IPL

Video : आंद्रे रसेलनं घेतला बदला; AB च्या नावे नकोसा विक्रम

स्फोटक आणि आपल्या शैलीतील खास फटकेबाजीनं क्रिकेट रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा एबी डिव्हिलियर्सचा फ्लॉप शो

सुशांत जाधव

IPL 2021 In UAE : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील पहिल्या टप्प्यात ठिक-ठाक कामगिरी करणाऱ्या आरसीबीची (RCB) दुसऱ्या टप्प्यात अडखळत सुरुवात झाली. आयपीएल स्पर्धेपूर्वी विराट कोहलीने यंदाच्या हंगामानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतलाय. याचा विपरित परिणाम दिग्ग्जांनी बरलेलल्या संघावर होणार का? असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना पडला होता. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात तसाच काहीसा प्रकार पाहायला मिळाले.

कोलकाता नाईट विरुद्धच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा हा निर्णय फोल ठरला. तो स्वत: दुसऱ्या षटकात बाद झाला. आरसीबीचा अर्धा संघ अवघ्या 63 धावांत धावात बाद झाला होता.

स्फोटक आणि आपल्या शैलीतील खास फटकेबाजीनं क्रिकेट रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा एबी डिव्हिलियर्स याला तर एक धावही घेता आली नाही. एबी डिव्हिलियर्सने (Ab de Villiers) पहिल्या चेंडूवर विकेट फेकली. एबी डिव्हिलियर्सने या सामन्यापूर्वी 332 टी20 सामन्यात 38 च्या सरासरीने 9318 धावा केल्या आहेत. यात 4 शतक आणि 69 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 क्रिकेटमध्ये एबी डिव्हिलियर्सच्या खात्यात 430 षटकाराचीही नोंद आहे. पण हा तगडा फलंदाज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात विशेष छाप सोडण्यात अपयशी ठरला. आंद्रे रसेलनं त्याला पहिल्याच चेंडूवर बोल्ड केलं.

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर एबीच्या नावे नकोसा विक्रम जमा झाला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानावर आहे. 10 व्यांदा एबीच्या पदरी भोपळा पडला. विशेष म्हणजे या यादीत आरसीबीकडून खेळणारा ग्लेन मॅक्सवेल पहिल्या स्थानावर आहे. 11 वेळा तो शून्यावर बाद झाला आहे. जॅक्स कॅलिस आणि राशिद खान 9-9 वेळा खातेही न उघडता बाद झाले आहेत.

एबी डिव्हिलियर्स 4 वेळा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झाला. केकेआर विरुद्ध तो दुसऱ्यांदा खाते उघडण्यात अपयशी ठरलाय. याशिवाय हैदराबाद विरुद्ध दोन वेळा आणि राजस्थान आणि पंजाब विरुद्ध प्रत्येकी एकदा त्याला खाते उघडण्यात अपयश आले आहे. पहिल्या टप्प्यातील सामन्यात एबी डिव्हिलियर्सने आंद्रे रसेल विरुद्ध 12 चेंडूत 36 धावा कुटल्या होत्या. याचा बदला रसेलनं दुसऱ्या सामन्यात घेतल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT