IPL

Video: हरभजन अन् रसलची KKRच्या ड्रेसिंग रूममध्ये धमाल मस्ती!

विराज भागवत

KKR ने RCB ला ९ गडी राखून चारली धूळ

IPL 2021 KKR vs RCB: विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) १० षटके आणि ९ गडी राखून पराभूत केले. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना १९ षटकात केवळ ९२ धावा केल्या. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स यांसारखे बडे खेळाडू स्वस्तात बाद झाले. त्यानंतर कोलकाताच्या संघाने केवळ एका गड्याच्या मोबदल्यात हा सामना खिशात घातला. या विजयामुळे IPL 2021 Points Table मध्ये फारसा फरक पडला नाही, पण कोलकाताला महत्त्वाचे दोन गुण मिळाले. त्यानंतर कोलकाताच्या ड्रेसिंग रूममध्ये मजा मस्तीचे वातावरण होते.

कोलकाताच्या ड्रेसिंग रूममध्ये विजयानंतर धमाल सुरू होती. ही मजा मस्ती KKRने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट केली. या व्हिडीओमध्ये हरभजन सिंग आणि आंद्रे रसल यांनी सर व्हिव रिचर्ड्स यांची नक्कल केली. तसेच, सामन्यात दमदार कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंचे कौतुक करण्यात आले.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, प्ले ऑफ्समधील आपले स्थान कायम ठेवण्यासाठी कोलकाताला विजय महत्त्वाचा होता. पहिल्यांदा कोलकाताच्या गोलंदाजांनी बंगळुरूच्या फलंदाजांचा धुव्वा उडवला. तर नंतर शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यरने या कोलकाताच्या सलामीवीरांनी त्यांच्या गोलंदाजांनाही धूळ चारली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी ८२ धावांची भागीदारी केली. शुभमन गिल अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला. त्याचे अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकले. पण व्यंकटनेश अय्यरने संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT