KKR-Win-RR 
IPL

कोलकाताचा राजस्थानवर दणदणीत विजय; मुंबईची डोकेदुखी वाढली

विराज भागवत

राजस्थानने स्वत: पराभूत होत पंजाबलाही केलं स्पर्धेबाहेर

IPL 2021 KKR vs RR: राजस्थानविरूद्धच्या सामन्यात कोलकाताने तब्बल ८६ धावांनी मोठा विजय मिळवून Top 4 मध्ये स्थान पटकावले. शिवम मावीचा बळींचा चौकार आणि त्याला लॉकी फर्ग्युसनकडून मिळालेली ३ बळींची साथ यांच्या जोरावर कोलकाताने राजस्थानला अवघ्या ८५ धावांमध्ये गुंडाळलं. या विजयासह कोलकाताने १४ सामन्यात १४ गुणांसह आणि तगड्या नेट रनरेटसह चौथं स्थान गाठलं. आता मुंबईला जर प्ले-ऑफ्सची फेरी गाठायची असेल, तर उद्याच्या शेवटच्या साखळी सामन्यात मुंबईला भल्या मोठ्या फरकाने सनरायजर्स हैदाराबादच्या संघाला पराभूत करावेच लागेल.

कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला राजस्थानचा धुव्वा

कोलकाताच्या संघाने २० षटकात १७१ धावा केल्या होत्या. शारजाच्या मैदानावरील ही यंदाच्या हंगामातील सर्वाधिक धावसंख्या होती. या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थान संघाची त्रेधातिरपीट उडाली. यशस्वी जैस्वाल (०), लियम लिव्हिंगस्टोन (६), संजू सॅमसन (१), अनुज रावत (०), शिवम दुबे (१८), ग्लेन फिलिप (८), ख्रिस मॉरिस (०) हे सारे खेळाडू स्वस्तात बाद झाले. राहुल तेवातियाने ४४ धावांची खेळी केली, पण त्याला कोणाचीही साथ मिळू शकली नाही. अखेर ८५ धावांवर राजस्थानचा संपूर्ण संघ तंबूत परतला.

राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई

नाणेफेक गमावलेल्या कोलकाता संघाला आजच्या सामन्यात मोठा विजय आवश्यक असताना सलामीवीरांनी दमदार सुरूवात केली. शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी तुफान फटकेबाजी केली. अय्यरने ३८ तर शुबमन गिलने ५६ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर नितीश राणा (१२) आणि राहुल त्रिपाठी (२१) झटपट बाद झाले. अखेर दिनेश कार्तिक (नाबाद १३) आणि मॉर्गनने (नाबाद १४) संघाला १७१ धावांपर्यंत मजल मारून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांनी 'सुपर डान्सर चॅप्टर ५' मध्ये आदितीला दिला खास पाठिंबा

SCROLL FOR NEXT