Pollard-Mumbai-Indians 
IPL

IPL 2021: 'पोलार्ड नक्की काय करत होता?' माजी क्रिकेटपटूचा सवाल

विराज भागवत

मुंबईचा पहिल्याच सामन्यात चेन्नईकडून पराभव

IPL 2021 MI vs CSK: युएईमध्ये रंगलेल्या IPLच्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नईच्या संघाने विजयी सलामी दिली. चेन्नईने मुंबई संघावर २० धावांनी विजय मिळवला. ऋतुराज गायकवाडच्या नाबाद ८८ धावांच्या जोरावर चेन्नईने १५६ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पोलार्डच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाला २० षटकात केवळ १३६ धावाच करता आल्या. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पोलार्डने नेतृत्व केलं, पण माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने त्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले.

"मुंबईने गोलंदाजीत चांगली सुरूवात केली होती. त्यांनी संघाला चांगल्या परिस्थितीत नेऊन ठेवला. पोलार्डच्या नेतृत्वाखाली संघाकडून चांगली सुरूवात अपेक्षित होती. ती सुरूवात मिळालीही होती. CSKचे ४ गडी बाद झाले होते. रायुडू दुखापतीमुळे माघारी गेला होता. अशा वेळी जास्तीत जास्त गडी बाद करण्याकडे मुंबईचा कल असायला हवा होता. पण महत्त्वाच्या वेळी पोलार्डने योग्य ते बदल केले नाहीत. पोलार्डने त्यावेळी जसप्रीत बुमराहला गोलंदाजी दिली असती तर चेन्नईची अवस्था ४० ते ५० धावांमध्ये ७ बाद अशी होऊ शकली असती. कदाचित ८० धावांमध्ये संघ बादही झाला असता. पोलार्ड त्यावेळी नक्की काय विचार करत होता माहिती नाही, पण त्याने चांगली संधी घालवली आणि सामना फिरला", असे रोखठोक मत केविन पीटरसनने मांडले.

मुंबई कुठे चुकली? पोलार्डने दिलं उत्तर

"ऋतुराज गायकवाड याने उत्कृष्ट फलंदाजी केली. टी२० क्रिकेट सामन्यात जर एखादा फलंदाज पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत पिचवर तळ ठोकून उभा राहत असेल तर तो प्रतिस्पर्धी संघाला चांगलाच महाग पडतो. आमच्या गोलंदाजांनी योग्य पद्धतीने डावाची सांगता केली नाही. आमच्याकडून २० धावा जास्त दिल्या गेल्या. पिच गोलंदाजीसाठी उत्तम होतं. नवा चेंडू स्विंग होत होता. आमच्या गोलंदाजांनी झटपट बळी टिपले होते. पण ती लय आम्हाला कायम ठेवता आली नाही", असं पोलार्डने कबूल केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT