Fabian Allen IPL Twitter
IPL

VIDEO : कॅरेबियन गड्याचा भन्नाट कॅच; रॉयल इंग्लिश मॅनचा खेळ खल्लास!

राजस्थानकडून पहिला सामना खेळणाऱ्या लिविंगस्टोनने चांगली सुरुवात केली. पण...

सुशांत जाधव

पंजाब किंग्ज Punjab Kings (PBKS) च्या ताफ्यातील अष्टपैलू फॅबिन एलेनने (Fabian Allen) राजस्थान विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षणाचा जबरदस्त नजराणा दाखवून दिला. लायम लिविंगस्टोनने फटकावलेला चेंडू सीमापार जाईल असे वाटत होते. पण कॅरेबियन खेळाडूने याचे झेलमध्ये रुंपातरित करत संघाला यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

लुईस आणि संजू सॅमनची विकेट पडल्यानंतर इंग्लिश ताफ्यातील लिविंगस्टोन मैदानात उतरला. राजस्थानकडून पहिला सामना खेळणाऱ्या लिविंगस्टोनने चांगली सुरुवात केली. 17 चेंडूत 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने त्याने 25 धावा केल्या. तो पंजाबसाठी घातक ठरेल असे वाटत होते. पण अर्शदीपच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. अशक्यप्राय वाटणारा झेल टिपत कॅरेबियन खेळाडून सर्वांचे लक्ष वेधले.

लिविंग्टोनने जो पहिला सिक्सर मारला होता तो तब्बल 97 मीटर अंतरावर पडला होता. अर्शदिपच्या गोलंदाजीवर खेळलेला स्टोकही त्याच्या खात्यात 4 किंवा 6 धावा देऊन जाईल, असे वात होते. पण फॅबिन एलनने अप्रतिम झेल टिपत त्याच्या स्फोटक खेळीला ब्रेक लावला.

पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानच्या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर लिविंगस्टोनने यशस्वी जयस्वालसह तिसऱ्या विकेटसाठी 48 धावांची खेळी केली. 30 चेंडूत दोघांनी 48 धावा करत पंजाबला बॅकफूटवर आणले. राजस्थानचा संघ 200 पार धावसंख्या उभारेल असे वाटत होते. पण अर्शदीपने घेतलेल्या 5 विकेट आणि इतर गोलंदाजांनी त्याला दिलेली साथ यामुळे पंजाबने राजस्थानला 185 धावांवर रोखले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

Ganesh Festival 2025 : खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या; पूजा आणि सजावटीच्या साहित्यासाठी पुणेकरांची लगबग

SCROLL FOR NEXT