Virender Sehwag ON PBKS Playing 11 
IPL

बेबी डायपरही एवढ्या पटकन बदलत नाहीत; सेहवागचा पंजाबला टोला

विरेंद्र सेहवागने पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

सुशांत जाधव

IPL 2021 : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात स्पर्धेतील 32 वा सामना खेळवण्यात येत आहे. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात पंजाबने प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल केला. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघातील हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात सुरु आहे.

भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि पंजाब संघाचा भाग राहिलेला विरेंद्र सेहवागने पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. सेहवागने क्रिकबझच्या कार्यक्रमात पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनवर भाष्य केले. तो म्हणाला की, बेबी डायपरही इतक्या वेळात बदलत नाहीत जितक्या वेळात पंजाबचा संघ आपली प्लेइंग इलेव्हन बदलतात.

पंजाब किंग्जच्या प्लेइंग इलेव्हनचा अंदाज बांधणे सर्वात कठीण काम असते. पहिल्या सात सामन्यात त्यांनी गोलंदाजीत सातत्याने बदल केले आहेत. फलंदाजीमध्ये गेल, राहुल, अग्रवाल, पूरन यांना त्याने पसंती दिली होती. पण गेलला बाकावरच बसवण्यात आले. याशिवाय गोलंदाजी बिश्नोईलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही.

सहवागने राजस्थान रॉयल्सचा संघ संतुलित असल्याचे म्हटले होते. उर्वरित हंगामात स्टार खेळाडूंनी माघार घेतली आहे. त्यामुळे संघात बदल दिसणे अनिवार्य आहे, असे सेहवागने सांगितले होते.

राजस्थान रॉयल्स Rajasthan Royals (Playing XI):

यशस्वी जयस्वाल, एविन लुईस, संजू सॅमसन (यष्टरक्षक/ कर्णधार), लायम लिविंगस्टोन, महिपाल लोमरार, रियान पराग, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, मुस्तफिझूर रहमान, चेतन सकारिया, कार्तिक त्यागी.

पंजाबचा संघ Punjab Kings (Playing XI):

केएल राहुल (यष्टीरक्षक/ कर्णधार) मयांक अग्रवाल, एडन मार्करम, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, फेबिन एलेन, आदिल रशिद, हरप्रित ब्रार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, ईशान पोरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT