MI-vs-KKR-Points-Table 
IPL

IPL 2021 Points Table: कोलकाताचा मुंबई इंडियन्सला 'दे धक्का'

विराज भागवत

KKRने नेट रनरेटच्या जोरावर मुंबईला टाकलं मागे

IPL 2021 Points Table after MI vs KKR: मुंबईविरूद्ध कोलकाताच्या युवा खेळाडूंनी अप्रतिम खेळी करत संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने अनुभवी क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकाच्या (५५) जोरावर १५५ धावा केल्या होत्या. या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना KKRचा सलामीवीर शुबमन गिल स्वस्तात माघारी परतला. पण, व्यंकटेश अय्यरने ३० चेंडूत ५३ धावांची दमदार खेळी केली. अनुभवी राहुल त्रिपाठीनेही त्याला चांगली साथ दिली. राहुलने शेवटपर्यंत पिच न सोडता ४२ चेंडूत नाबाद ७४ धावा कुटल्या. कोलकाताच्या वादळी खेळीपुढे मुंबईच्या स्टार गोलंदाजांचाही धूळधाण उडाली. त्यामुळेच, नेट रनरेटच्या जोरावर KKRने मुंबईला खाली ढकलत Top 4 मध्ये प्रवेश केला. महत्त्वाची बाब म्हणजे, मुंबईचा मोठा पराभव झाल्याने त्यांना राजस्थानच्याही खाली सहाव्या स्थानावर विराजमान व्हावे लागले आहे.

पाहा कसं आहे सध्याचं Points Table

दरम्यान, नाणेफेक जिंकून कोलकाताच्या कॅप्टन मॉर्गनने प्रथम गोलंदाजी घेतली. रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक जोडीने मुंबईला हवाई सुरूवात मिळवून दिली होती. पण रोहित बाद झाला आणि संघाच्या धावगतीला हळूहळू लगाम लागला. क्विंटन डी कॉकने आपलं अर्धशतक पूर्ण करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून देण्यात मोलाचं योगदान दिलं. पण कोलकाताच्या फलंदाजांनी हे आव्हान सहज पार केलं. व्यंकटेश अय्यरने ५३ तर त्रिपाठीने नाबाद ७४ धावा केल्या. पण गोलंदाजीत कमाल दाखवत २० धावा देऊन १ बळी टिपणाऱ्या सुनील नारायणला सामनावीर घोषित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farm Loan Waiver: कर्जमाफीचा पहिला हप्ता अखेर वितरीत, नवीन कर्ज लगेच मिळणार का? मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितलं!

Vaibhav Sooryavanshi: भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी वैभव सूर्यवंशी सज्ज; नागपूरात पोहोचला... कोणाची मदत घेतोय?

Abhijeet Dipke: सरकारची अमेरिकन कंपनीच्या मदतीने दिपकेवर पाळत? वैयक्तिक माहिती प्रदर्शित केली?

Marathi News Live Updates : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; भरधाव वाहन दोन वेळा पलटी

Palghar News: पोषण आहाराला कात्री, डहाणूतील ३५ आश्रमशाळांमध्ये चपातीचा पुरवठा बंद

SCROLL FOR NEXT