Sanju Samson  -
IPL

IPL 2021 : संजूला 24 लाखाचा दंड; पुन्हा तीच चूक केली तर बॅन

संजू सॅमसनशिवाय संघातील इतर खेळाडूंच्या मानधनातील 25 टक्के रक्कम कपात करण्यात येणार आहे.

सुशांत जाधव

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात 70 धावांची नाबाद खेळी करुनही अपयशी ठरलेल्या संजू सॅमसनला आणखी एक धक्का बसला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवानंतर त्याच्या खिशालाही कात्री लागली आहे. अबू धाबीच्या मैदानात दिल्ली विरुद्धच्या लढतीत षटकांची गती कमी राखल्याबद्दल राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

संजू सॅमसनशिवाय संघातील इतर खेळाडूंच्या मानधनातील 25 टक्के रक्कम कपात करण्यात येणार आहे. संजू सॅमसनच्या दंडात्मक कारवाईच्या रकमेत दुबईतील पंजाब विरुद्धच्या सामन्यासाठी 12 लाख आणि दिल्ली विरुद्धच्या सामन्यातील 12 लाख दंड वसूल करण्यात येणार आहे. जर पुढच्या सामन्यातही संघाच्या षटकांची गती कमी राहिली तर संजू सॅमसनवर एका मॅचची बंदी घालण्याची कारवाई होऊ शकते.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात त्याने एकच चूक दुसऱ्यांदा केली आहे. यापूर्वी पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यातही राजस्थानने निर्धारित वेळेत षटके टाकली नव्हती. अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार सामन्यात संघाने विजयही नोंदवला होता. पण याच सामन्याची पुन्हा पुनरावृत्ती झाली. आयपीएलच्या नियमावलीचे दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यामुळे सामना गमावण्यासोबत कॅप्टन आणि प्लेइंग इलेव्हनमधील संघाच्या खिशालाही कात्री लागलीये.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना राजस्थानला 33 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थानकडून संजू सॅमसनने कर्णधाराला साजेसा खेळ केला. त्याने 53 चेंडूत 70 धावांची नाबाद खेळी केली. पण त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT