DC vs RR Twitter
IPL

VIDEO : अश्विनचा रिव्हर्स स्विप फटका अन् त्यानंतरची गम्मत-जम्मत!

अश्विनचा रिव्हर्स स्विप आणि त्यानंतर धाव घेण्यासाठीची कसरत बघण्याजोगी होती.

सुशांत जाधव

IPL 2021 : संजू सॅमसन (Sanju Samson) ची नाबाद 70 धावांची एकाकी झुंज व्यर्थ ठरवत दिल्ली कॅपिटल्सने 33 धावांनी विजय नोंदवला. अबूधाबीच्या मैदानातील या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने आपले 'प्ले ऑफ'मधील स्थान निश्चित केले आहे. आतापर्यंत झालेल्या 10 सामन्यातील 8 विजयासह दिल्ली कॅपिटल्सने 16 गुण मिळवले असून गुणतालिकेत (IPL Points Table) अव्वलस्थान पटकावले आहे. तर दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पराभवानंतर राजस्थानची गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरण झालीये. 43 धावा करणाऱ्या श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राजस्थान आणि दिल्ली यांच्यातील सामन्यादरम्यान अश्विन फलंदाजी करत असताना एक मजेशीर घटना घडल्याचे पाहायला मिळाले. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील अखेरच्या षटकात अश्विनचा रिव्हर्स स्विप आणि त्यानंतर धाव घेण्यासाठीची कसरत बघण्याजोगी होती. अखेरच्या षटकात मुस्तफिझुर रहमान गोलंदाजी करत होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर अश्विनने रिव्हर्स स्विप फटका मारण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क झाला नाही. चेंडू थेट संजू सॅमसनच्या हातात गेला.

नॉन स्टाइकवर असलेल्या ललित यादवने चोरटी धाव घेण्यासाठी क्रिज सोडले होते. मग अश्विनही धाव घेण्यासाठी क्रिजमधून बाहेर पडला. पण संजू सॅमसनने टाकलेला थ्रो मुस्तफिझुर रहमानला विकेटवर फेकण्यात अपयश आले. रन आउट होता-होता वाचल्यानंतरही अश्विनने पुन्हा दुसरी धाव घेतली. या सगळ्या प्रकाराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 'द कॉमेडी ऑफ एरर्स' या कॅप्शनसह शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसते.

अश्विनने पूर्ण केला 250 विकेट्सचा टप्पा

आर अश्विनने राजस्थान विरुद्धच्या सामन्यात मिलरची विकेट घेत खास विक्रम आपल्या नावे केला. त्याने टी-20 कारकिर्दीत 250 विकेट घेतल्या आहेत. हा पल्ला गाठणारा भारताचा तो तिसरा गोलंदाज ठरलाय. अश्विनपूर्वी अमित मिश्रा आणि पियूष चावला यांनी 250 + विकेट घेतल्या आहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT