Suresh-Raina-Bat-Broken-CSK 
IPL

Video: रैना ५ महिन्यांनी मैदानात उतरला खरा पण बॅटने केला घात

विराज भागवत

सुरेश रैनाने मोठा फटका खेळण्यासाठी बॅट फिरवली आणि...

IPL 2021 in UAE: स्पर्धेचा दुसरा टप्पा मुंबई विरूद्ध चेन्नई या सामन्याने सुरू झाला. चेन्नई संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. पण कॅप्टन कूल धोनीचा हा निर्णय चुकल्याचे दिसून आले. चेन्नई सुपर किंग्ज संघाला पॉवर प्ले मध्ये ३० धावाही करता आल्या नाहीत. पण महत्त्वाचे म्हणजे त्यांचे ३ गडी बाद झाले तर एक गडी दुखापतीमुळे मैदान सोडून गेला. या साऱ्या प्रकारात सुरेश रैना याला त्याच्या बॅटनेच दगा दिल्याचे दिसून आले.

सुरेश रैना विरूद्ध ट्रेंट बोल्ट असा संघर्ष मैदानावर रंगला होता. बोल्टने सलग दोन ते तीन चेंडू बाऊन्सर टाकले. त्यातील एक चेंडू रैनाच्या हेल्मेट जवळूनही गेला. पण रैना त्यातून बचावला. त्यानंतर रैना चेंडूचा बाऊन्स चुकवण्यासाठी क्रीजमधून पुढे आला आणि त्याने जोरदार फटका लगावला. त्यावेळी बॅटची कड लागून चेंडूचा चौकार गेला. पण पुढच्याच चेंडूवर रैनाने हवेत फटका मारताना बॅट तुटली आणि चेंडू जवळच उडल्याने तो झेलबाद झाला.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, CSKचा डाव सुरू झाला आणि त्यांच्या २ धावांत २ बळी गेले. सलामीवीर फाफ डू प्लेसिस, मोईन अली आणि अंबाती रायुडू हे तिघेही शून्यावर तंबूत गेले. डू प्लेसिस आणि मोईन अली हे दोघे शून्यावर बाद झाले. तर अंबाती रायुडू दुखापतग्रस्त होऊन तंबूत गेला. त्यानंतर रैना बाद झाला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून अपेक्षा होत्या पण तोदेखील स्वस्तात बाद झाला. पण रविंद्र जाडेजा आणि ड्वेन ब्राव्हो या दोघांच्या साथीने मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने सामना रंगवला. ऋतुराजने ५८ चेंडूत नाबाद ८८ धावा कुटल्या. त्याने ९ चौकार आणि ४ षटकार लगावले. जाडेजाने २६ धावा केल्या. तर ड्वेन ब्राव्होने ३ षटकारांसह ८ चेंडूत २३ धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT