Ajinkya Rahane Speaking in Bengali Language esakal
IPL

VIDEO: मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचे अस्खलित बंगाली ऐकले का?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: आयपीएल 2022 चा (IPL 2022) हंगाम आजपासून (दि. 26 मार्च) सुरू होत आहे. हंगामातील पहिलाच सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात होणार आहे. यंदाच्या हंगामात केकेआरचा नवा संघ आपल्याला मैदानावर दिसणार आहे. विशेष म्हणजे मुंबईकर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) कोलकात्याकडून खेळताना दिसेल. (Ajinkya Rahane Speaking in Bengali Language)

मुंबईत होणाऱ्या या सामन्यासाठी कोलकाता सज्ज होत आहे. याचदरम्यान, केकेआरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंवरून मुंबईकर अजिंक्य रहाणेचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये मराठमोळा अजिंक्य अस्खलित बंगाली (Bengali Language) बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत एक तासात अजिंक्यचा हा इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ जवळपास 1 लाख लोकांनी पाहिला आहे.

आयपीएलच्या 15 व्या हंगामात सलामीलाच भिडणाऱ्या सीएसके आणि केकेआर यांचे एकमेकांविरूद्धचे आतापर्यंतचे रेकॉर्ड पाहिले तर या दोन्ही संघात 26 आयपीएल सामने झाले आहेत. त्यातील तब्बल 17 सामन्यात सीएसकेने विजय मिळवला असून केकेआरला फक्त 8 सामन्यातच विजय मिळवता आला आहे. एक सामना अनिर्णित राहिला होता. ही आकडेवारी पाहिली तर सीएसकेचा पेपर कायम केकेआरसाठी अवघड गेल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT