IPL 2022 Auction Gautam Gambhir a Mentor of Lucknow Super Giants Strategically Brought Plenty Of Spinner
IPL 2022 Auction Gautam Gambhir a Mentor of Lucknow Super Giants Strategically Brought Plenty Of Spinner esakal
IPL

IPL 2022 Auction: गंभीरनं डोकं लावलं अन् लखनौनं फिरकीचं जाळ विणलं!

अनिरुद्ध संकपाळ

बंगळुरू : आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी बंगळुरूमध्ये दोन दिवसाचा मेगा लिलाव सुरू (IPL 2022 Auction) आहे. या लिलावात लखनौ सुपरजायंट (Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्स हे दोन नवे संघ सामील होणार असल्याने लिलावात चांगलीच चुरस निर्माण होणार हे नक्की होतं. यातील लखनौ सुपरजायंट संघाला दोन आयपीएल टायटल जिंकणारा कर्णधार मेंटॉर म्हणून लाभला होता. गौतम गंभीरने (Gautam Gambhir) लखनौ सुपरजायंटचा संघ बऱ्याच गोष्टी डोक्यात ठेवून बांधला. त्यामुळे त्यांचा संघ सध्याच्या घडीला सर्वात चांगला संघ दिसत आहे.

गौतम गंभीरने लिलावादरम्यान, बोलताना सांगितले की, आम्ही काही खेळाडू ठरवून खरेदी केले. यात मुंबई इंडियन्सचा सलामीवीर क्विंटन डिकॉक (Quinton De Kock) आणि आवेश खानचा समावेशी आहे. डिकॉक आता फक्त मर्यादित षटकांचे सामने खेळणार आहे. त्यामुळे तो कायम संघासाठी उपलब्ध असेल. याचबरोबर तो विकेटकिपर आणि चांगला डावखुरा फलंदाज आहे. तो दोन्ही भुमिका चांगल्या प्रकारे निभावू शकतो. लखनौने डिकॉकला 6.75 कोटी रूपयाला खरेदी केले.

याचबरोबर लखनौ सुपरजायंटने वेगावान गोलंदाज आवेश खानसाठी (Avesh Khan) देखील 10 कोटी रूपये मोजले. लखनौने ही खरेदी देखील ठरवून केली. गंभीर म्हणाला आम्हाला वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाज हवा होता म्हणून आम्ही आवेश खानसाठी आग्रही बोली लावली. गंभीर पुढे म्हणाला की यंदाची आयपीएल ही एक किंवा दोन राज्यात होणार आहे. त्यामुळे स्पर्धेच्या उत्तरार्धात विकेट फिरकीला (Spinners) पोषक होईल. त्यामुळे लखनौने आपल्या संघात दर्जेदार चांगल्या संख्येने फिरकी गोलंदाजांची भरती केली.

लखनौने लेग स्पिनर रवी बिश्नोईला (Ravi Bishnoi) आधीच रिटेन केले होते. त्याचबरोबर आता ऑफ स्पिनर के गौतम (K. Gowtham), डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीम या फिरकीपटूंना आपल्या गोटात खेचले. याचबरोबर लखनौने दीपक हुड्डा (Deepak Hooda) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) हे दोन फिरकी अष्टपैलू देखील आपल्यासोबत ठेवले आहेत. त्यामुळे संघाची बॅटिंग डेप्थ देखील वाढते आणि फिरकीचे पर्याय देखील जास्त प्रमाणात उपलब्ध होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT