IPL 2022 Sakal
IPL

IPL 2022 : ठाकरे सरकारच्या निर्णयानंतर प्रेक्षकांसाठी BCCI चा रिव्ह्यू

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोरोना निर्बंध हटवल्यानंतर बीसीसीआयकडून (BCC) आयपीएल चाहत्यांना आनंदाची बातमी दिलीये. राज्यातील पुणे आणि मुंबईतील चार स्टेडियमवर रंगणाऱ्या आयपीएल (IPL 2022) सामन्यासाठी स्टेडियमच्या प्रेक्षक क्षमतेच्या 50 टक्के तिकीटे विक्री केली जाणार आहेत. सध्याच्या घडीला 25 टक्के एवढ्या मर्यादेनं स्टेडियमवर प्रवेश दिला जातोय. इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या आगामी सामन्यासाठी स्टेडियममध्ये 50 टक्के प्रेक्षक क्षमतेनं प्रवेश देण्यासंदर्भात बीसीसीआय तयार असल्याचे समजते.

बीसीसीआय (BCCI) 5 एप्रिलपासून होणाऱ्या सामन्याला 50 टक्के प्रेक्षक क्षमतेसह सामने खेळवण्यास उत्सुक आहे. त्यामुळे पुण्यासह मुंबईतील तीन स्टेडियमवरील गजबज आणखी वाढल्याचे पाहायला मिळेल. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर उद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील निर्बंध पूर्णत: हटवण्याचा निर्णय 31 मार्च रोजी घेतलाय. मास्कमुक्तीची घोषणा करताना एखादा उत्सव साजरा करताना मास्क अनिवार्य असणार आहे. त्यामुळे आयपीएल सामन्यावेळी प्रेक्षक मर्यादा वाढली असली तरी मास्क घालूनच प्रेक्षकांना मैदानात एन्ट्री देण्यात येईल.

'द हिंदू' वृत्तानुसार, बीसीसीआय (BCCI) राज्य सरकारच्या परवानगीनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) ला 5 एप्रिलपासून 50 टक्के मर्यादेनं प्रेक्षकांना स्टेडियममध्ये एन्ट्री देण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. 5 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात स्टेडियमच्या क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik Case: टीसीएस प्रकरणात नवा ट्विस्ट! 'एचआर' निघाली प्रेग्नंट; फरार निदा खान मुंबईत

Shaktipeeth Highway : ब्रह्मचैतन्य महाराजांच्या गोंदवल्याची शासनाकडून उपेक्षा? शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्यात समावेश, पण ग्रामपंचायतीसमोर मोठं आव्हान

पुढचे 24 तास महत्त्वाचे! मीन राशीत 'चतुर्ग्रही राजयोग'; लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने 'या' 5 राशी होणार मालामाल!

Solapur Temperature: साेलापूरचा पारा ४३.४ अंशांवर; तापमानाचा पुन्हा उच्चांक; शनिवारपासून उतरणार पारा, अवकाळी अन्‌ ढगाळ वातावरणाचाही अंदाज!

मित्रानेच केला मित्राचा गेम, मुली पटवण्याची शर्यत अन् पैशांच्या वादातून घेतला बदला; अमरावती प्रकरणात मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT