IPL 2022 Chennai Super Kings vs Mumbai Indians  esakal
IPL

MI vs CSK : चेन्नई चारी मुंड्या चीत; मुंबईने पराभवाचे उट्टे काढले

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : मुंबई इंडियन्सने कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जचा 5 विकेट्सनी पराभव केला. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या मुंबईने इंग्लंडला 97 धावातच गुंडाळले. त्यानंतर चेन्नईने देखील मुंबईला विजयासाठी चांगलेच झुंजवले. त्यांनी मुंबईची अवस्था 4 बाद 33 धावा अशी केली होती. अखेर तिलक वर्मा आणि ऋतिक शोकीनने भागीदारी रचून मुंबईला विजयाच्या जवळ पोहचवले. त्यानंतर टीम डेव्हिडने आक्रमक फटकेबाजी करत 14.5 षटकात 103 धावा करत टार्गेट पूर्ण केले. मुंबईकडून गोलंदाजीत डॅनियल सॅम्सने 3 तर चेन्नईकडून मुकेश चौधरीने 3 विकेट घेतल्या. सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाबाद 36 धावा केल्याने सीएसके 97 धावांपर्यंत पोहचू शकली.

Highlights :

तिलक वर्माची झुंजार खेळी

मुंबईची 4 बाद 33 अशी बिकट अवस्था झाली असताना तिलक वर्माने संयमी खेळी करत विजयापर्यंत पोहचवले. त्याने नाबाद 34 धावांची खेळी करत मुंबईला 5 विकेट्सनी विजय मिळवून दिला.

81-5 मोईन अलीने शौकीनचा उडवला त्रिफळा

33-4 : मुकेश चौधरीसमोर मुंबईची उडाली दाणादाण

चेन्नईने 98 धावांचे माफक आव्हान पार करताना मुंबईची सुरूवात देखील खराब झाली. पहिल्याच षटकात इशान किशन 6 धावा करून बाद झाला. त्याला मुकेश चौधरीने बाद केले. त्यानंतर सिमरजित सिंगने रोहित शर्माला 18 धावांवर बाद करत मुंबईला दुसरा धक्का दिला. यानंतर मुंकेश चौधरीने पाचव्या षटकात डॅनियल सॅम्स आणि ट्रिस्टन स्टब्सला शुन्यावर बाद करत मुंबईची अवस्था 4 बाद 33 अशी केली.

कर्णधार धोनीची 36 धावांची झुंजार खेळी मात्र संघ 97 धावात परतला. 

39-6 : मेरेडिथने दुबेची देखील केली शिकार

मुंबईच्या मेरेडिथने शिवम दुबेला 10 धावांवर बाद करत चेन्नईला 6 वा धक्का दिला.

29-5 : चेन्नईचा निम्मा संघ माघारी

मॅरेडिथने अंबाती रायुडूला 10 धावांवर बाद करत चेन्नईला पाचवा धक्का दिला.

17-4 : डॅनियलचा अजून एक दणका

पहिल्याच षटकात चेन्नईला दोन धक्के देणाऱ्या डॅनियल सॅम्सने ऋतुराज गायकवाडला 7 धावांवर बाद करत चौथा धक्का दिला.

5-3 : बुमराहने दिला सीएसकेला दुसरा धक्का

जसप्रीत बुमराहने रॉबिन उथप्पाला 1 धावेवर बाद करत चेन्नईला दुसऱ्याच षटकात तिसरा धक्का दिला.

2-2 : डॅनियल सॅम्सने चेन्नईला दिले पाठोपाठ दोन धक्के

डॅनियल सॅम्सने पहिल्याच षटकात चेन्नई सुपर किंग्जला दोन धक्के दिले. त्याने दुसऱ्याच चेंडूवर गेल्या सामन्यातील हिरो डेवॉन कॉनवॉयला शुन्यावर बाद केले. त्यानंतर आलेल्या मोईन अलीला चौथ्या चेंडूवर बाद केले.

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मुंबईकडून ट्रिस्टन स्टब्स करणार पदार्पण

मुंबई इंडियन्सकडून ट्रिस्टन स्टब्स करणार आजच्या सामन्यात पदार्पण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT