IPL 2022 Commentary in Gujarati Language
IPL 2022 Commentary in Gujarati Language  esakal
IPL

IPL 2022 मध्ये गुजराती संघाबरोबरच गुजराती भाषेचीही एन्ट्री

सकाळ डिजिटल टीम

इंडियन प्रिमियर लीगचा (IPL 2022) लवकरच 15 वा हंगाम सुरू होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना 26 मार्चला मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. हा सामना गतविजेती चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स संघात होणार आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात लखनौच्या नवाबी थाट तर गुजराती तडका देखील पहावयास मिळणार आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनौ सुपर जायंट हे दोन नवे संघ यंदा आयपीएलमध्ये दिसणार आहेत. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये गुजराती संघाबरोबरच गुजराती भाषेची (Gujarati Language) देखील एन्ट्री झाली आहे.

गेल्या काही वर्षापासून आयपीएलच्या सामन्यांची कॉमेंन्ट्री (Commentary) इंग्रजी, हिंदी भाषेबरोबरच मराठी, तमिळ आणि कन्नड भाषेत ही होत आहे. 2021 ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आयपीएलची कॉमेंन्ट्री मराठी भाषेत (Commentary In Marathi) करण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर आयपीएलने मराठी भाषेचाही समावेश केला होता. आता गुजराती संघाचा आयपीएलमध्ये समावेश असल्यामुळे गुजराती भाषेत कॉमेंन्ट्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्टार स्पोर्टचे प्रमुख संजोग गुप्ता यांनी इंडियन एक्सप्रेसेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आयपीएलचा हा हंगाम खुप वेगळा असणार आहे. शनिवारी आणि रविवारी हेणाऱ्या सामन्याची कॉमेंन्ट्री ही बंगाली आणि मल्याळम भाषेत असणार आहे. आयपीएलचे सामने महाराष्ट्रात होणार आहेत त्यामुळे 74 सामन्यांची मराठी भाषेत कॉमेंन्ट्री असणार आहे. गुजरात संघाच्या सामन्याव्यतिरिक्त प्लेऑफच्या (Play Off) सामन्यांचिही गुजराती भाषेत कॉमेंन्ट्री (Commentary In Gujarati) असणार आहे. गुजराती भाषेत कॉमेंन्ट्री करण्यासाठी यष्टीरक्षक आणि फलंदाज नयन मोंगिया, भारतीय संघाचा अष्टपैलु खेळाडू इरफान पठान आणि माजी यष्टीरक्षक किरण मोरे असू शकतात असे सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT