IPL 2022 David Warner Ravi Bishnoi Contest  ESAKAL
IPL

DC vs LSG : वॉर्नरवर बिश्नोईचे 4 बॉल पडले होते भारी! आज काय होणार?

सकाळ डिजिटल टीम

आयपीएलच्या 15 व्या हंगामातील (IPL 2022) आज 15 वा सामना लखनौ सुपर जायंट (Lucknow Super Giants) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात होत आहे. हा सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात दिल्लीच्या संघात ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (David Warner) देखील खेळणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात वॉर्नरचा शो चाहत्यांना पहावयास मिळणार आहे. दरम्यान, या सामन्यात लखनौचा रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात द्वंद्वयुद्ध रंगण्याची शक्यता आहे. या दोघांचे एकमेकांविरूद्ध असलेले रेकॉर्ड खूप रंजक आहे.

रवी बिश्नोईने डेव्हिड वॉर्नरला फक्त चार चेंडू टाकले आहेत. या चार चेंडूत रवी बिश्नोईने डेव्हिड वॉर्नरला तब्बल दो वेळा बाद केले आहे. आज डेव्हिड वॉर्नर आणि रवी बिश्नोई यांच्यात जर द्वंद्व रंगले तर वॉर्नर बिश्नोईच्या फिरकीवर काही तोड काढणार की बिश्नोई वॉर्नरची नेहमीप्रमाणे शिकार करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दिल्लीसाठी डेव्हिड वॉर्नर संघात आल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीची फलंदाजी आता मजबूत झाली आहे. तसेच सलामीला एक तगडा फलंदाज आल्याने दिल्लीच्या मधल्या फळीवरील ताण काही प्रमाणात कमी होणार आहे.

यंदाच्या हंगामाबाबत बोलायचे झाले तर आतापर्यंत लखनौ सुपर जायंटने तीन सामन्यातील 2 सामने जिंकले असून एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दिल्लीने आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. त्यातील एका सामन्यात दिल्लीचा विजय तर एका सामन्यात पराभव झाला आहे. लखनौ सुपर जायंटची फलंदाजी चांगली होत आहे. तसेच लखनौचे गोलंदाज देखील फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे दिल्लीसाठी लखनौ चांगलीच आव्हानात्मक ठरण्याची दाट शक्यता आहे. दिल्लीच्या संघात वॉर्नर बरोबरच एनरिक नॉर्खिया याचाही समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Bageshwar warning : ‘’.. तर या देशातील हिंदू १९९२ ची पुनरावृत्ती करण्यास तयार आहेत’’ ; बाबा बागेश्वर यांचा इशारा!

मुंबईतील चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची धमाल गोष्ट; 'गोट्या गँगस्टर'चा ट्रेलर लाँच, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Ambegaon News : बिबट्याच्या दहशतीने आंबेगाव तालुक्यातील धार्मिक-सामाजिक जीवन ठप्प; भाविकांमध्ये भीतीचे सावट!

Solapur Political : जशा निवडणूका येतील तशी पात्र आणि चित्र बदलणारी चित्राताईं- भगीरथ भालके!

Pune Crime : तरुणीने केले जिवाभावाच्या मैत्रिणीवर चाकूने वार; कोरेगाव पार्क परिसरातील घटना!

SCROLL FOR NEXT