Ajinkya Rahane  Sakal
IPL

IPL ड्रामा! तीन चेंडूत तीन वेळा बाद झाला अजिंक्य, पण...

सकाळ डिजिटल टीम

डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने (DC) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात कोलकाता नाईटरायडर्ससमोर (KKR) 216 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ 171 धावांत आटोपला. ज्या मैदानात शार्दुल ठाकूर (11 चेंडूत नाबाद 29) आणि अक्षर पटेलनं (14 चेंडूत नाबाद 22 धावा कुटल्या त्या मैदानात अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane )दुहेरी आकडाही गाठता आला नाही. शार्दुल आणि अक्षर जोडीनं अखेरच्या 20 चेंडूत केलेल्या 49 धावांमुळे कोलकाता संघ बॅकफूटवर गेला. कोलकाताकडून सुनील नारायण याने 21 धावा खर्च करुन दोन विकेट घेतल्या.

धावांचा पाठलाग करताना कोलकाताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरलेला अजिंक्य रहाणे दबावात खेळताना दिसला. आयपीएलच्या आतापर्यंतच्या सामन्यात कमालीची गोष्ट प्रेक्षकांनी अनुभवली. मुस्तफिझुरच्या पहिल्याच चेंडूवर अजिंक्य रहाणे विरोधात कॅच आउटची जोरदार अपली झाली. मैदानातील अंपायरने त्याला बादही दिले. अजिंक्यने यशस्वी रिव्हू घेतला. अंपायरिंगचा ड्रामा इथेच थांबला नाही तर दुसऱ्या चेंडूवर पुन्हा पायचितची अपील झाली. पुन्हा मैदानातील पंचांनी अजिंक्यला बाद ठरवले.

थर्ड अंपायरने पुन्हा निर्णय बदलला आणि अंजिक्य रहाणे नाबाद ठरला. तिसऱ्या चेंडूवर चेंडू पुन्हा अजिंक्यच्या बॅटची कड घेऊन विकेट किपर रिषभ पंतच्या हाती गेला. पण यावेळी ना फिल्डर्संनी अपील केली ना पंचांनी त्याला बाद दिले. त्यामुळे तीन वेळा आउट होऊनही तो क्रिजवर खेळताना दिसले. पण या संधीच त्याला सोनं करता आले नाही. 14 चेंडूचा सामना करुन तो खलील अहमदच्या गोलंदाजीवर शार्दुल ठाकूरकडे झेल देऊन तंबूत परतला. अजिंक्य रहाणेनं केवळ 8 धावा केल्या.

अजिंक्य रहाणेच्या कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे त्याने टीम इंडियातील आपली जागा गमावली आहे. एवढेच नाही तर बीसीसीआयच्या वार्षिक करारातही त्याच्या श्रेणीत घसरण झाली आहे. कारकिर्दीत संघर्षाचा सामना करत असताना आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यावर भरवसा दाखवला. त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेत सलामीची संधी दिली. पण तो पुन्हा अपयशी ठरला. रहाणेची कामगिरी अशीच राहिली तर त्याच्यासमोरील अडचणीत दिवसांदिवस वाढत जातील हे मात्र निश्चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

Latest Marathi News Live Update : कल्याण रेल्वे स्थानकात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT