Delhi Capitals vs Rajasthan Royals Match Shifted Pune To Mumbai  esakal
IPL

IPL 2022 : दिल्ली 'कोरोनाग्रस्त' फटका मात्र पुण्याला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दिल्ली कॅपिटल्समधील (Delhi Capitals) एका पाठोपाठ एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus) आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर विलगीकरणात असलेल्या दिल्लीला प्रवास बंदी करण्यात आल्याने त्यांचा पंजाब किंग्ज विरूद्धचा सामना पुण्याऐवजी मुंबईत शिफ्ट केला होता. आता दिल्लीचा 22 एप्रिल रोजी पुण्याच्या एमसीए (Pune MCA Stadium) मैदानावर होणार राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरूद्धचा सामना देखील मुंबईत हलवण्यात आला आहे. हा सामना आता वानखेडे स्टेडियमवर होत आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयने आजचा सामना सुरू होण्यापूर्वी दिली.

दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना 22 एप्रिलला पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर होणार होता. मात्र दिल्लीच्या संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या प्रवासावर बंधने आली आहेत. त्यामुळे बुधवारी 20 एप्रिलला पंजाब किंग्ज बरोबरचा पुण्यात होणारा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हवलण्यात आला होता. आता दिल्लीचा पुण्यात होणारा दुसरा सामना देखील मुंबईत हवलण्यात आला आहे. आधीच पुण्याच्या वाट्याला मुंबईतील स्टेडियमपेक्षा कमी आयपीएलचे सामने आले होते. पुण्यात आयपीएलचे 15 सामने होणार होते. मात्र आता दिल्लीचे पुण्यातील दोन्ही सामने मुंबईत हलवण्यात आले आहेत.

दिल्लीच्या संघातील जवळपास सहावा सदस्य आज कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. न्यूझीलंडचा विकेट किपर टीम सैफर्टची आरटी - पीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे संपूर्ण दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला दुहेरी कोरोना चाचणी प्रक्रियेतून जावे लागले. त्यानंतर आता दिल्ली आणि पंजाब किंग्जमधील सामना ब्रेबॉर्नवर सुरू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT