IPL 2022 Jos Buttler Yuzvendra Chahal  ESAKAL
IPL

VIDEO : 'आल्यापासून तू माझ्यावर दबाव टाकतो आहेस'; बटलरची चहलविरूद्ध तक्रार

सकाळ डिजिटल टीम

आयपीएल 2022 (IPL 2022) च्या राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने (Jos Buttler) हंगामातील पहिले शतक ठोकले. जोस बटलरने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करत 68 चेंडूत 100 धावा केल्या. यात त्याने 11 चौकार आणि 5 षटकात मारले.

या शतकाच्या जोरावरच राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. दरम्यान सामना झाल्यानंतर युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) जोस बटलरची आयपीएल टीव्हीसाठी (IPL TV) मुलाखत घेतली. त्यावेळी जोस बटलरने जेव्हापासून मी या हंगामात आलो आहे तेव्हापासून तू माझ्यावर सातत्याने दबाव टाकत आहेस असे म्हणाला. या व्हिडिओत चहल आणि जोस बटलर दोघेही एकमेकांची खेचत होते. चहलने बटलरला तू बॅटिंग करताना खूप आत्मविश्वासाने भरलेला वाटत होतास याचे कारण मी आठव्या - नवव्या क्रमांकावर फलंदाजी करणार होतो?

चहलच्या या प्रश्नावर बटलरने देखील मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला की, 'जेव्हापासून मी या हंगामात खेळण्यासाठी आलो आहे तेव्हापासून तू माझ्यावर दबाव टाकत आहेस. त्यामुळे मला तुला रोखण्यासाठी चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे.'

राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने 20 षटकात 8 विकेट्सच्या मोबदल्यात 193 धावा केल्या होत्या.

राजस्थानच्या या विजयासाठी दिलेल्या 194 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 20 षटकात 8 विकेट्सच्या मोबदल्यात 170 धावांपर्यंतच मजल मारता आली. राजस्थानने हा सामना 23 धावांनी जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC World Cup: महिला विश्वविजेत्यांचा ‘डायमंड’ सन्मान! हिरे आणि सौर उर्जेची दुहेरी भेट; उद्योगपती आणि खासदारांकडून खास गिफ्ट

DAYA DONGRE DIED: एका युगाचा अंत! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन; प्रेक्षकांची खट्याळ सासू हरपली

Raju Patil: भाजपचं प्रेम फक्त निवडणुकीपुरतं, इफ्तार पार्टीवरून राजू पाटील यांचा टोला

Ganesh Kale Murder Case: गणेश काळे खून प्रकरणातले चार आरोपी सराईत गुन्हेगार; दोन अल्पवयीन आरोपींवरही गुन्हे

मी तशी नाहीये... 'कमळी' मालिकेतील भूमिकेमुळे होणाऱ्या टीकेवर अनिकाने मांडली बाजू; म्हणते, 'मला वाईट वाटतं जेव्हा...

SCROLL FOR NEXT