IPL 2022 Viral News Sakal
IPL

IPL दरम्यान पॉर्न स्टार चर्चेत; आधीही घडलं होतं असंच काही!

सकाळ डिजिटल टीम

आयपीएल 2022 (IPL 2022) च्या हंगामाला सुरुवात झाली आहे. नव्या हंगामातील दोन नव्या संघातील लढतीत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) स्पर्धेत विजयी सलामी दिली. लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) विरुद्धच्या लढतीत मोहम्मद शमीनं (Mohammed Shami) जबरदस्त बॉलिंग केली. त्याची ही कामगिरी हॉलीवूड अभिनेत्रीलाही भूरळ पाडणारी अशी होती. ट्विटच्या माध्यमातून तिने शमीच्या कामगिरीवर फिदा झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

या सामन्यात मोहम्मद शमीनं 4 ओव्हरमध्ये 25 धावा खर्च करुन 3 विकेट घेतल्याचे पाहायला मिळाले. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. शमीचा भेदक मारा पाहून अमेरिकन पॉर्नस्टार केंड्रा लस्ट (Pornstar Kendra Lust) ने खास ट्विट केल्याचे पाहायला मिळाले. शमीची कामगिरी दमदार होती, अशा आशयाचे ट्विट तिने केले आहे.

केंड्रा लस्ट (Kendra Lust) अमेरिकेतील पॉर्न स्टार आहे. पॉर्न स्टारसोबतच ती दिग्दर्शकही आहे. केंड्रा क्रिकेटसह बॉलिवूडलाही फॉलो करते. आयपीएलमधील सामन्याबद्दल तिने ट्विट केल्यामुळे ती चांगलीच चर्चेत आलीये. आयपीएल मॅचदरम्यान पॉर्न स्टार चर्चेत येण्याची ही काही पहिली वेळ नाही. मागच्या हंगामात मिया खलिफाही एका ट्विटमुळे चर्चेत आली होती. पण हे प्रकरण थोड वेगळं होतं.

इंडियन प्रीमियर लीगच्या गत हंगामात भारतात रंगलेले सामने कोरोनामुळे स्थगित करण्यात आले होते. या लीगमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱा युवा क्रिकेटर गोलंदाज हरप्रीत ब्रार याचे एक ट्वीट व्हायरल झाले होते. त्याने माजी पॉर्न स्टार मिया खलिफा हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मिया खलिफाला बी लेटेड बर्थडे विश केल्यानंतर हरप्रीतला काही नेटकऱ्यांनी ट्विट डिलीट करण्याचा सल्लाही दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Clash: मिरजेत दोन गटात राडा; तणाव नियंत्रणात, स्वतः एसपी उतरले रस्त्यावर

Himachal Pradesh Bus Landslide : हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये भीषण दुर्घटना; बसवर दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू!

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या! वडील महावितरणमध्ये वरिष्ठ अधिकारी; अभ्यासात हुशार, घरची स्थिती चांगली, बहीणही मेडिकललाच, तरी केली उचलले टोकाचे पाऊल

विद्यापीठाच्या युवा महोत्सवात मानपानावरून कुलगुरुंसमवेत वाद; स्टेजवर बोलावून मानमान न दिल्याने अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सत्कार न स्विकारताच परतले

मोठी ब्रेकिंग! सोलापुरातील समर्थ सहकारी बॅंकेच्या व्यवहारावर ‘आरबीआय’चे निर्बंध; काय आहेत निर्बंध, वाचा...

SCROLL FOR NEXT