IPL 2022 KKR Pat Cummins  Sakal
IPL

IPL 2022 : पाकमुळे शाहरुखच्या KKR ला स्पर्धेआधी मोठा धक्का

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) संघाला मोठा धक्का बसलाय. संघातील भरवशाचा आणि हुकमी एक्का ठरेल असा जलगती गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) सुरुवातीच्या सामन्याला मुकणार आहे. त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियन एरॉन फिंच (Aaron Finch) देखील पहिल्या पाच सामन्याला मुकणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाचे मेंटॉर डेव्हिड हसी याने (David Hussey) बुधवारी ऑनलाईन पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भातील माहिती दिली. केकेआरने मेगा लिलावात पॅट कमिन्ससाठी 7.25 कोटी रुपये मोजले होते. त्याशिवाय हेल्सने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर केकेआरने अनसोल्ड फिंचला 1.50 कोटी रुपयांसह आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं होते. ऑस्ट्रेलियन संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामने सोडून ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएलसाठी वेळेत हजर राहणे शक्य नाही. कमिन्स आणि फिंच सुरूवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध नसले तरी पाक दौरा आटोपून ते संघाला जॉईन होऊन मॅचसाठी सज्ज होतील, असेही डेव्हिड हसीने यावेळी सांगितले.

ऑस्ट्रेलियन संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पॅट कमिन्स चांगलाच लयीत दिसतोय. त्याचा फायदा कोलकाता नाईट रायडर्सलाही ऑस्ट्रेलिय संघाचा पाकिस्तान दौऱ्यातील शेवटचा सामना 5 एप्रिलला संपणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएलसाठी भारतात दाखल होतील. संघाला जॉईन होण्यापूर्वी त्यांना तीन दिवस क्वांरटाईनच्या प्रक्रियेतून जावे लागेल.

गत हंगामात इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्संच्या संघाने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत फायनल गाठली होती. फायनलमध्ये त्यांना चेन्नई सुपर किंग्ज कडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आयपीएलच्या नियमानुसार गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि उप विजेता कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील लढतीने यंदाच्या हंगामाला सुरुवात होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Road: बकरी ईदच्या कुर्बानीला बकरा आणला, विरोध म्हणून हिंदुत्ववाद्यांनी डुक्कर आणलं; मिरा रोड परिसरात तणाव, VIDEO VIRAL

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार? काँग्रेस वापरणार भाजपचा 'बिहार पॅटर्न'

Latest Marathi News Live Update : चाकण बाजार समितीत कांदा उत्पादक आक्रमक

Shaktipeeth Highway Protest : ‘शक्तिपीठ’ महामार्गाविरोधात सर्वाधिक विरोध आजरा तालुक्यातून, शेतकऱ्यांनी एकत्र येत हरकती नोंदवल्या

'मिलिंद आणि माझ्यात 21 वर्षांचं अंतर होतं...' मिलिंद सोमणसोबतच्या रिलेशनशिपबाबत अभिनेत्री म्हणाली, 'आमचं ओपन रिलेशन...'

SCROLL FOR NEXT