Priyanka Jawalkar And Venkatesh Iyer  Sakal
IPL

'जवळकर' अय्यरचे अभिनेत्री प्रियांकासोबतचे चॅट व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

Indian Premier League 2022 : आयपीएलच्या गत हंगामातील दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धा युएईच्या मैदानात पार पडली होती. युएईच्या मैदानातून व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून आयपीएलमध्ये दमदार पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच कोलकाताने मेगा लिलावाआधीच त्याला रिटेन केले. यंदाच्या हंगामात आतापर्यंत तो नावाला साजेसा खेळ करु शकलेला नाही. पण एका वेगळ्याच कारणाने तो चर्चेत आलाय. अभिनेत्रीसोबतचे त्याचे चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (IPL 2022 KKR Star Venkatesh Iyer Cute Chat With Telugu Actress Priyanka Jawalkar)

आयपीएलमधील धमाकेदार खेळीनंतर एका वर्षांच्या आत त्याने टीम इंडियातही एन्ट्री मारली. त्याने वनडे आणि टी-20 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात तो पुन्हा आपल्यातील धमक दाखवण्यासाठी सज्ज झालाय. त्याआधी सोशल मीडियावरील कमेंट्सनं तो चर्चेत आलाय. मुळात व्यंकटेश अय्यर सोशल मीडियावर फारसा सक्रीय नसतो. पण तेलुगु अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट केल्यामुळे तो आता चर्चेत आला आहे. त्याची कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतेय.

तेलुगु अभिनेत्री प्रियांका जवळकर (Priyanka Jawalkar) हिने इन्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला होता. यावर व्यंकटेश अय्यरनं Cute! अशी कमेंट केली. यावर प्रियांकाने 'कौण? तू?' असा प्रतिप्रश्न केल्याचे पाहायला मिळाले. या दोघांच्यातील हा संवाद सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काही नेटकरी या दोघांमध्ये काहीतरी सुरु आहे, अशा प्रतिक्रियाही देत आहेत. प्रियांकाने 2017 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. तिने आतापर्यंत चार तेलुगु चित्रपटात काम केले आहे. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीयही असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT