Kolkata Knight Riders signed T20 World Cup winning captain Aaron Finch
Kolkata Knight Riders signed T20 World Cup winning captain Aaron Finch  esakal
IPL

IPL 2022: अखेर वर्ल्डकप विजेत्या कर्णधारावर केकेआरला आली दया

सकाळ डिजिटल टीम

ऑस्ट्रेलियाने युएई आणि ओमानमध्ये झालेला 2021 चा वर्ल्डकप (T20 World Cup 2021) जिंकला. हा ऑस्ट्रेलियाचा (Australia) पहिला वहिला टी 20 वर्ल्डकप होता. ऑस्ट्रेलियाने अ‍ॅरोन फिंचच्या (Aaron Finch) नेतृत्वात ही कामगिरी केली होती. त्यामुळे आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात (IPL 2022 Auction) फिंचला चांगला भाव येईल असे वाटले होते.

मात्र चांगला भाव राहू देत 10 पैकी एकाही फ्रेंचायजीने त्याच्याकडे पाहिले देखील नाही. मात्र आता कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) फिंचवर दया आली असल्याचे दिसते. त्यांनी इंग्लंडच्या अ‍ॅलेक्स हेल्सची (Alex Hales) रिप्लेसमेंट म्हणून फिंचला आपल्या चमूत सामील करून घेतले आहे. (Kolkata Knight Riders signed T20 World Cup winning captain Aaron Finch)

इंग्लंडच्या हेल्सने बायो बबलचा तिटकारा आला असल्याने आपण आयपीएलमधून (Indian Prmier League) माघार घेत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे केकेआरला (KKR) त्याची रिप्लेसमेंट शोधावी लागणार होती. केकेआरने यासाठी जास्त वेळ न दवडता लगेचच ऑस्ट्रेलियाचा टी 20 वर्ल्डकप विजेता कर्णधाराला गळाला लावले. फिंचने ऑस्ट्रेलियाकडून 88 टी 20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 2686 धावा केल्या आहेत. यात दोन शंभर आणि 15 अर्धशतकांचाही समावेश आहे.

फिंचने 87 आयपीएल सामने देखील खेळले असून त्यात च्याने 2000 धावा केल्या आहेत. केकेआरने त्याला बेस प्राईस 1.5 कोटी रूपये देऊनच संघात सामील केले आहे. फिंच 2020 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर बेंगलोरकडून खेळला होता. त्यात त्याला 12 सामन्यात फक्त 268 धावाच करता आल्या होत्या. त्यानंतर आरसीबीने 2021 च्या लिलावात त्याला रिलीज केले होते. तो लिलावात अनसोल्ड राहिला होता.

केकेआरने दोन वेळा आयपीएलवर नाव कोरले असून आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरूवात तेच करणार आहेत. त्यांचा 26 मार्चला चेन्नई सुपर किंग्जबरोबर सामना रंगणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT