Kumar Sangakkara On Ashwin
Kumar Sangakkara On Ashwin  Sakal
IPL

अश्विनच्या 'टायमिंग'वर संगकारा फिदा; म्हणाला...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि लखनौ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants ) यांच्यातील रंगतदार सामन्यात आर अश्विनच्या रिटायरमेंट विकेटची जोरदार चर्चा सुरु आहे. यावर वेगवेगळ्या चर्चा रंगत असताना आता राजस्थान संघाचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट आणि मुख्य कोच कुमार संगकारा (Kumar Sangakkara) याने या मुद्यावर भाष्य केले आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात आर. अश्विनने (R Ashwin) योग्य वेळी ‘रिटायर आउट’ होण्याचा निर्णय संघासाठी फायदेशीर ठरल्याचे म्हटले आहे. रियान पराग आणि रस्सी वान डर डुसेन यांना लवकर पाठवले नाही, ही चूक होती, असेही तो म्हणाला आहे.

आयपीएलच्या इतिहासात (IPL 2022) राजस्थान पहिला असा संघ ठरलाय की ज्यांनी ‘रिटायर आउट’ची रननिती अवलंबली. रविवारी झालेल्या सामन्यात अश्विन (R Ashwin) याने 28 धावांवर खेळत असताना स्वत: डग आउटमध्ये गेल्याचे पाहायला मिळाला. आता ही रणनिती दुसरे संघही अवलंबताना दिसू शकते.

कुमार संगकारा म्हणाला की, ‘ हा निर्णय घेण्याची योग्य वेळ अश्विनने स्वत: निवडली. आम्ही डग आउटमध्ये यासंदर्भात चर्चा केली होती. यंदाच्या हंगामात आपला पहिला सामना खेळणाऱ्या दक्षिण अफ्रिकेच्या वान डर डुसेन आणि शिमरॉन हेटमायर यांना अश्विन आणि रियान पराग आधी पाठवण्यात आले. अश्विनची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या परागने अखेरच्या षटकात षटकार मारुन संघाला 165 धावांपर्यंत पोहचवले. रॉयल्सने हा सामना अवघ्या तीन धावांनी जिंकला होता.

रियानचा फायदा करुन घेता आला नाही

श्रीलंकेचा माजी कर्णधार संगकारा म्हणाला की, कोचिंग वेळी माझ्याकडून एक चूक झाली. रियान परागला रास्सी वान डर डुसेनच्या आधी पाठवायला पाहिजे होते. रियान परागच्या फटकेबाजीचा फायदा उठवायला मुकलो. अश्विनने संघासाठी आपली विकेटचा त्याग दिला, अशा शब्दांत त्याने अश्विनच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. लखनौ संघाला अखेरच्या षटकात 15 धावांची गरज होती. यावेळी पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या कुलदीप सेन याने अनुभवी मार्कस स्टॉयनिससमोर उत्तम गोलंदाजी केली. त्याचेही संगकाराने कौतुक केल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT