Evin Lewis
Evin Lewis Sakal
IPL

IPL Record : लुईसची जलद फिफ्टी; ऑल टाइम रेकॉर्ड कुणाच्या नावे?

सकाळ डिजिटल टीम

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या 15 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या लढतीत कॅरेबियन स्फोटक फलंदाज चमकला. एविन लुईसच्या (Evin Lewis) नाबाद अर्धशतकाच्या जोरावर लखनौ सुपर जाएंट्सनं गतविजेत्यांना चांदणे दाखवत दिमाखदार विजय नोंदवला. या सामन्यात एविन लुईसनं हंगामातील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. त्याने अर्धशतक करण्यासाठी 23 चेंडूचा सामना केला. त्याने या सामन्यात 55 धावांची नाबाद मॅच विनिंग खेळी केली. शिवम दुबेच्या गोलंदाजीवर षटकार खेचून त्याने अर्धशतक साजरे केले. यंदाच्या हंगामात यापूर्वी राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसन आणि चेन्नईकडून रॉबिन उथप्पाने 27 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. या दोघांना मागे टाकून यंदाच्या हंगामात सर्वात जलद अर्धशतक आता एविन लुईसच्या नावे झाले आहे.

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात 23 चेंडूतील 23 वे अर्धशतक

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, एबी डिव्हिलियर्स, संगकारा, युवराज सिंग या दिग्गजांनी 23 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. या यादीत आता एविन लुईसच्या नावाचा समावेश झाला आहे. एबी डिव्हिलियर्सने पाच वेळा 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आहे. एविन लुईसचं अर्धशतक 23 चेंडूतील 23 वे अर्धशतक ठरले.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक जलद अर्धशतक कुणाच्या नावे?

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम हा लोकेश राहुलच्या नावे आहे. 2018 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या लढतीत लोकेश राहुलनं पंजाबचे नेतृत्व करताना 14 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. त्याच्यापाठोपाठ या यादीत युसूफ पठाणचा नंबर लागतो. त्याने 15 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. 2014 मध्ये युसूफ पठाणने कोलकाताचे प्रतिनिधीत्व करताना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध स्फोटक फलंदाजी केली होती. सीएसकेकडून सुरेश रैनाने 16 चेंडूत (पंजाब विरुद्ध), तर मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या इशान किशनने हैदराबाद विरुद्ध 16 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे.

आयपीएलच्या लिलावात बेस प्राइजला उचलले

आयपीएलच्या मेगा लिलावात एविन लुईस याच्यावर कोणीही बोली लावली नव्हती. कॅरेबियन स्फोटक फलंदाजासाठी कोणीच रस दाखवत नसताना लखनौनं मूळ किंमतीत त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. त्याची मूळ किंमत दोन कोटी इतकी होती. कॅरेबियन लीगसह आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने आपल्यातील क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे त्याला मिळालेली रक्कम तशी कमीच आहे. पण लखनौसाठी फायद्याचा सौदा ठरताना दिसतोय. लखनौ संघाला त्याच्या रुपात जॅकपॉट लागलाय असेच म्हणावे लागेल. स्वस्तातला गडी त्यांना चांगलाच उपयुक्त ठरू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

SCROLL FOR NEXT