Sreesanth  Sakal
IPL

IPL Auction : 'हार के जितनेवाला बाजीगर'; श्रीसंतनं शेअर केलेला व्हिडिओ बघाच

सुशांत जाधव

IPL 2022 Mega Auction : भारतीय वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य आणि केरळकडून पुन्हा क्रिकेटच्या मैदानात कमबॅक केलेल्या श्रीसंतचा (Sreesanth) पत्ता पुन्हा कट झाला. मेगा लिलावासाठी त्याने 50 लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह नाव नोंदणी केली होती. दुसऱ्या दिवशी लिलाव संपला पण त्याचे नाव काही आले नाही. याआधी जो मिनी लिलाव झाला होता त्यावेळी त्याच्यावर हीच वेळ आली होती. पुन्हा एकदा त्याचा पत्ता कट झाला.

39 वर्षीय क्रिकेट स्फॉट फिक्सिंगच्या आरोपामुळे कलंकित झाला होता. कोर्टातील लढाई जिंकल्यानंतर 7 वर्षानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमबॅक केले आहे. आयपीएलच्या अंतिम यादीत शॉर्टलिस्टेट झाल्यानंतर त्याने आनंदी भावना व्यक्त केली होती. पुन्हा आयपीएलच्या रिंगणात खेळण्याचा त्याचा जोश मेगा लिलावात गळून पडला.10 फ्रँचायझीपैकी एकानेही त्याच्यावर भरवसा ठेवला नाही. परिणामी त्याचे नावच आले नाही.

ज्या चाहत्यांनी माझ्या क्षमतेवर विश्वास दाखवला त्यांचे खूप आभार. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी अजूनही उत्सुक आहे. ही फक्त सुरुवात होती. प्रत्येक वेळी माझ्याकडून सर्वोत्परी प्रयत्न करणे सोडणार नाही, असे ट्विट श्रीसंतने केले आहे. याशिवाय मेगा लिलाव संपल्यानंतर त्याने आणखी एक ट्विट केले आहे. यात त्याने विष्णू विनोदचा सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ शेअर केलाय.

हा व्हिडिओ मन जिंकणारा असाच आहे. श्रीसंतशिवाय विष्णू विनोद, केएम असिफ आणि बासिल थंपी या मल्याळम खेळाडूंचा आयपीएल लिलावात सहभाग होता. विष्णू विनोदला 50 लाख रुपयांत सनरायझर्स हैदराबादने आपल्या ताफ्यात घेतलं. त्याचा आनंद श्रीसंतने व्यक्त केलाय. आपलं सिलेक्शन झाल नसलं तरी आपल्या सहकऱ्याला संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त करुन श्रीसंतने मनाचा मोठेपणाच दाखवून दिलाय. विष्णूला त्याने शुभेच्छाही दिल्या आहेत.

2008 ते 2013 या कालावधीत श्रीसंतने किंग्ज पंजाब, कोची टस्कर केरळा, राजस्थान रॉयल्स या संघाकडून आयपीएलमध्ये प्रतिनिधीत्व केले आहे. 44 सामने तो खेळला. 2013 मध्ये स्पोट फिक्सिंगमुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला ब्रेक लागला. सात वर्षानंतर तो निर्दोष असल्याचा निकाल कोर्टाने दिला. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून त्याने क्रिकेटमध्ये पुन्हा कमबॅक केले. केरळकडून रणजी संघातही त्याची निवड झाली आहे. आयपीएलमध्ये भाव मिळाला नसल्याने निराश न होता तो आता रणजीवर फोकस करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT