ipl 2022 | ambani reaction suryakumar yadav wicket sakal
IPL

संपलं! सूर्यकुमार यादव बाद झाल्यानं आकाश अंबानी निराश: पाहा व्हायरल फोटो...

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये बुधवारी झालेल्या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) ला पराभव

Kiran Mahanavar

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये बुधवारी झालेल्या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) ला पराभव पत्करावा लागला. हंगामात मुंबई इंडियन्सचा सामना हरण्याची ही पाचवी वेळ होती. मुंबईला या हंगामात आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही.

पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केला. एकेवेळी मुंबई इंडियन्स हा सामना जिंकेल असे वाटत होते. सूर्यकुमार यादव बाद होताच आशाही भंग पावली. सूर्यकुमार यादवने आपल्या डावात 30 चेंडूत 43 धावा केल्या. त्यादरम्यान त्याने एक चौकार आणि चार षटकार ठोकले आहे.

सूर्यकुमार यादव 43 धावांवर खेळत होता तेव्हा सतत चौकार- षटकार मारत होता. पण त्याच वेळी सीमारेषेजवळ त्याचा झेल बाद झाला. यादरम्यान मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी स्टँडवर आश्चर्यकारक प्रतिक्रिया लगेचच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

19व्या षटकातील चौथ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने मोठा फटका खेळला झेलबाद झाला. यासह मुंबई इंडियन्सच्या विजयाच्या आशेचा किरण मावळला. या मॅचमध्ये आकाश अंबानीशिवाय त्याची पत्नी श्लोका अंबानी आणि आई नीता अंबानीही सामना पाहिला आल्या होत्या.

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 198 धावा केल्या होत्या, प्रतिउत्तर देताना मुंबई इंडियन्सचा संघ केवळ 186 धावा करू शकला. मुंबईसाठी डेवाल्ड ब्रेविसने 49 धावांची खेळी खेळली आणि त्याच्या खेळीत पाच षटकार मारले. या मोसमात मुंबई इंडियन्सचा हा सलग पाचवा पराभव असून, संघ अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT