MI vs RR Kieron Pollard Sakal
IPL

VIDEO : पोलार्डची तगडी प्रॅक्टीस; MI बसच्या फुटल्या काचा |MI vs RR

सकाळ डिजिटल टीम

IPL 2022, MI vs RR : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा संघ (MI) यंदाच्या हंगामातील पहिला सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्धच्या सामन्यापूर्वी संघातील खेळाडूंनी कसून सराव केला. यात कायरॉन पोलार्डच्या (Kieron Pollard) नेट प्रॅक्टिसमधील षटकाराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

राजस्थान विरुद्धच्या सामन्यापूर्वी स्फोटक फलंदाजाने नेटमध्ये दमदार फटकेबाजी केली. मुंबई इंडियन्सने प्रॅक्टिस सेशनमधील कायरॉन पोलार्डचा एक व्हिडिओ आपल्या अधिकृत अकाउंटवरुन शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये पोलार्डने उत्तुंग षटकाराने संघाच्या बसची काच फोडल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजस्थान विरुद्ध धमाका करण्यासाठी पोलार्ड सज्ज आहे, असेच मुंबई इंडियन्सला या व्हिडिओतून सांगायचे आहे.

कायरॉन पोलार्डने आयपीएल (IPL) मध्ये आतापर्यंत 179 सामने खेळले आहेत. यात त्याच्या नावे 3271 धावा जमा आहेत. वेस्ट इंडीज संघाच्या कर्णधाराने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत 16 अर्धशतकासह 65 विकेट घेतल्या आहेत. नाबाद 87 ही त्याची स्पर्धेतील सर्वोच्च खेळी आहे. मुंबईच्या ताफ्यातील तो हुकमी एक्का आहे. सामन्याला एकहाती कलाटणी देण्याची त्याच्यात क्षमता आहे. जर तो टिकला तर भल्या भल्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणतो. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात तो कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT