Mumbai Indians Family
Mumbai Indians Family  Sakal
IPL

किती गोड! रितिकाच्या कवेत डेल्फी; समायरा काढतेय फोटो

सकाळ डिजिटल टीम

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) खेळाडूशिवाय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याची पत्नी रितिका (Ritika Sajdeh) आणि फॅमिलीतील इतर मंडळीही चर्चेत असतात. पुण्यातील मैदानात रंगणाऱ्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने रितिका, समायरा आणि फॅमिलीतील आणखी दोन सदस्यांचा खास व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये समायराची नवी मैत्रीण पुण्यातील सामना पाहण्यासाठी तयार होताना दिसते. रितिकासोबत दिसणारी ही नवी क्युट परी कोण? असा प्रश्नही काहींना पडला असेल.

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या इन्स्टा अकाउंटवरुन जो व्हिडिओ शेअर केलाय. त्यात रोहितची पत्नी रितिका सजदेह, समायरा आणि टायमल मिल्सची (Tymal Mills) मुलगी डेल्फी (Delphi Laine Mills) दिसत आहे. यंदाच्या हंगामात टामल मिल्स मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळताना दिसतोय. इंग्लिश क्रिकेटर आपल्या फॅमिलसह संघाला जॉईन झालाय. पुण्यातील सामन्यासाठी तो आपली मुलगी डेल्फीला तयार करताना दिसते. मुंबई इंडियन्सची जर्सी तो तिला घालतोय. रितिकाही या गोड मुलीचे लाड करताना दिसते. दुसरीकडे समायरा कॅमेऱ्या स्किल दाखवून देताना पाहायला मिळते.

याआधीही रितिका आणि टायमल मिल्सची पत्नी India-Kate McLaven या दोघी आपल्या लेकींसह स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी आल्याचे पाहायला मिळाले होते. प्रत्येक सामन्याला या दोघी संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी लावत असतात. पुण्याचे मैदानही त्याला अपवाद ठरणार नाही, असेच संकेत या व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT